|
Karadkar
| |
| Sunday, December 04, 2005 - 4:12 am: |
| 
|
नेमस्तक, मी कटाच्या आमटीसाठी नविन BB चालु करायचा प्रयत्न केला पण तिथे सगळे आकडे दिसायला लगले म्हणुन इथे पोस्ट करतेय. तुम्हाला हलवावी लागेल ही रेसिपी. तसदीबद्दल ़मस्व. कटाची आमटी - फोडणी साठी - तेल, कढीपत्ता, हिंग, हळ्द, जिरे, मोहरी. इतर साहित्य - गोडा मसाला, मिठ, लाल तिखट, ओले खोबरे-कोथींबीर वाटण, थोडा चिंचेचा कोळ, थोडे पुरण. कट, वाटण, चिंच, पुरण, मिठ, तिखट, मसाला एकत्र करुन उकळायला ठेवावे. पाणी कमी जास्ती बघावे. कारण जसजशी आमटी उकळते तसे पाणी घालावे लागते. सधारण १५ ते २० मिनिटे उकळले की मग त्यात खमंग फोडणी घालावी आणि एक उकळी आणावी. अमच्याकडे देवाला कांदा-लसुण चलत नाही वगैरे असे काही नसते म्हणुन मग आम्ही त्यात कांदा लसुण मसाला, छोटा कांदा बारीक वाटुन, थोडा लसुण पण खोबर्याच्या वाटणात घालतो. तसे चाल्त असेल तर करुन बघा.
|
Dineshvs
| |
| Monday, December 12, 2005 - 4:21 pm: |
| 
|
माझी थोडी वेगळी पद्धत. का कुणास ठाऊक, पण आमच्याकडे पण या आमटीत कांदा लसुण घालत नाहीत. तर अर्धा किलो डाळीचा कट असेल तर. ( काहि नवख्यांच्या माहितीसाठी, पुरणपोळीसाठी चण्याची डाळ शिजवतात, तेंव्हा डाळ शिजली कि ते पाणी गाळुन घेतात. त्याला कट म्हणतात. कट जास्त हवा म्हणुन डाळ शिजताना मुद्दाम जास्त पाणी घातले जाते. पण थेट कुकरमधे डाळ शिजवली तर कुकर दोन तृतियांशापेक्षा जास्त भरु नये. कारण हे पाणी फ़सफ़सुन बाहेर येते. डाळ बाहेर शिजवली तरी झार्याने वरचा फ़ेस काढावा लागतो. नुसत्या कटासाठी डाळ शिजवणे व्यवहार्य होत नाही. छोले म्हणजेच काबुली चणे शिजवताना, थोडी डाळ घातली तर त्याचापण कट तयार होतो. ) या प्रमाणात एक चमचा प्रत्येकी जिरे, खसखस व तीळ, दोन चमचे धणे, एखादी लवंग, एक ईंच दालचिनी, चार सहा मिरीदाणे, थोडे शहाजिरे, पाव वाटी सुके खोबरे, व चारसहा सुक्या मिरच्या तळुन पुड करुन घ्यावी. लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ काढावा. तेलाची फ़ोडणी करुन त्यात कडीपत्ता घालावा, व असल्याश शेवग्याच्या शेंगाचे तुकडे घालावेत. जरा परतुन पाणी घालावे. हळद हिंग घालुन चिंचेचा कोळ घालावा. चार सहा तिरफ़ळे फ़ोडुन घालावीत. ( काहि मोजक्या शाकाहारी पदार्थात तिरफ़ळे वापरता येतात. ) चिंचेचा कच्चट वास गेला कि मसाला घालुन जरा ऊकळावे. ( ताजा मसाला करणे शक्य नसेल तर काळा मसाला व तिखट घालावे ) मग कट ओतावा. मीठ घालुन ऊकळु द्यावे. थोडे वाटलेले पुरण घालावे, वेगळा गुळ घालु नये. हवी तर वरुन परत फ़ोडणीच्या मिरच्यांची फ़ोडणी द्यावी. हि आमटी दुसर्या तिसर्या दिवशी जास्त चवदार होते. मी खाताना त्यात तुप व तुरीच्या डाळीचे वरण घालुन खातो. पुरणपोळी बरोबर किंवा किंचीत करपलेल्या भातावर हे रसायन छानच लागते.
|
Nalini
| |
| Monday, December 12, 2005 - 5:41 pm: |
| 
|
भारतात आल्यावर पहिला मुक्काम गोव्यातच करणार आहे मी आमच्या कडे कटाच्या आमटीला ' सार' म्हणतात. तित गुळ तसेच चिंच नाही घालत. तसेही आमच्या कडे कोणत्याच भाजीत चिंच, गुळ नाही घालत. पण मला चिंच आणि गुळ घातलेल्या सर्वच भाज्या आवडतात. आले लसणाची पेष्ट गरम तेलात चांगली परतवुन घ्यावी. ह्यातुन तेल बाहेर पडायला लागले की त्यात धना पावडर टाकुन तीही चांगली परतवुन घ्यायची. लाल तिखट आणि गरम मसाला घालुन त्यात कट घालायचा व चवीपुरते मिठ घालायचे. झाकण ठेवुन चांगली उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत एक कांदा भाजुन घ्यायचा. तव्यावर थोडे तेल घालुन त्यावर ओल्या नारळाचे २ - ४ तुकडे भाजुन घ्यायचे. त्यातच मुठभर तांदुळ भाजुन घ्यायचे. त्यावरच भाजलेला कांदापण परतवायचा. हे सगळे बाजुला काढुन ठेवलेले पुरण, कोथिंबीर एकत्र बारिक वाटुन घ्यायचे. कटाला उकळी आलि की हे वाटण त्यात घालायचे. आणखी पातळ करायची असेल तर त्यात गरम पाणी घालयचे. लिंबाएवढे पोळ्याचे भिजवलेले पिठ एका ताटलित पाणि घेऊन त्यात कुस्करुन घ्यायचे. पिठ टाकुन द्यायचे. त्यातुन जे पांढरे पाणि निघते ते आमटीत घालायचे. चांगले हलवुन घेउन पुन्हा उकळु द्यायचे. वाढताना आवडत असेल तर लिंबु घ्यायचे. सार, भात, कुरडई, भजी हा गोपाळकाला फारच चवदार लागतो. ह्या आमटीत नुसती कुरडई(तळलेली बरं का!) घालुन खायला ही खुप छान लागते.
|
Prajaktad
| |
| Monday, December 12, 2005 - 8:32 pm: |
| 
|
हो!आमच्याकडे पण कटाची आमटी दिनेश ने सांगितलिय तशिच बनते...फ़क़्त तिरफ़ळ नाही घालत. घरि कटाची आमटी पुर्विपासुन पुरणावरणाच्या नैवद्यालाच व्हायचि त्यामुळे कदाचित कांदा लसुन घालत नसावे. या आमटित तळलेल्या कुरडया घालुन मस्त लागतात.किंवा भजि कुस्करलि कि instant भज्याचि आमटि होते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 13, 2005 - 1:29 am: |
| 
|
ये. अवश्य ये. म्हणजे मलापण तुझ्या हातचे खाता येईल. साधी कटाची आमटी, पण तिचे तीन प्रकार झाले. प्राजक्ता, मुळ कृतीत नाही घालत तिरफ़ळे, ही माझी आयडिया. पण छान चव येते. मिनोती, याला शाक पण म्हणतात का ? आपल्याकडे शाकभात हा एक बेत असतो. पुरणपोळी करायची नसेल तर तुरिची, चण्याची, मसुरीची, ऊडदाची व वालाची अश्या डाळी एकत्र करुन, शिजवुन घोटुन घेतल्या तर साधारण अश्या चवीची आमटी करता येते.
|
Karadkar
| |
| Tuesday, December 13, 2005 - 3:09 am: |
| 
|
नाही हो दिनेश मला शाक भात नाही माहीत. पण मम्मी अशीच करते कटाची आमटी. कधी कधी फोडणी आधी घालते. पण बकिचे तसेच. मल भात कटाची आमटी आणी दही प्रचंड आवडते.
|
Karadkar
| |
| Tuesday, December 13, 2005 - 3:13 am: |
| 
|
मी पुरण बरेचदा तुरिच्या डाळीचे करते कारण चणाडाळीचा त्रास होतो. छान होते. आणी आमटी पण मस्त होते.
|
Deemdu
| |
| Tuesday, December 13, 2005 - 5:05 am: |
| 
|
Aamacyaa kDcaI pNajaI AajaI pasauna caalat AalaolaI hI ÌtI kT qaÜDo paNaI Gaalauna ]kLt zovaayacaa %yaat kaLa masaalaaÊ icaMcaocaa kÜLÊ maIz AaiNa gauL Gaalauna
caaMgalao ]kLayacao. %yaanaMtr %yaat qaÜDo purNa laavaayacao AaiNa sarto XaovaTI vaÉna kZIp<yaacaI
fÜDNaI VayacaI
|
Manuswini
| |
| Friday, February 10, 2006 - 2:58 am: |
| 
|
माझी आई कटाची आमटी ही अशी करते भरपुर पाणी घातलेली चणाडाळिच उकळून पाणी घेते(चणाडाळ पुरणासाठी वापरते अर्थात), लसुणाच्या चार,पाच पाकळ्या, गरममसाला १ चमचा, थोडाच लाल मसाला, भरपूर कोथिंबीर, थोडस पुरण, किंचीत कांदा-खोबर्याच आधिच तयार केलेले वाटण टाकते उकळतान, हिंग आल बारिक वाटलेले, कोकम एखादच रोजची style ने फोडणी द्यायची. आम्ही मुल हा सूप म्हणून प्रकार पितो. म्हणून आई ज्यास्त मसालेदार बनवत नाही. भरपूर लसण आणि आले असल्याने बाधत नाही चणाडाळेची आमटी. आम्ही पुरण्पोळी बरोबर पण खातो. अगदी मटण्याच्या रश्यासारखी चव येते
|
Manuswini
| |
| Friday, February 10, 2006 - 3:02 am: |
| 
|
नलिनि तु गोव्याची का? तुझी वरची कटाची आमटी recipe आता वाचली, म्हणून हा अंदाज?
|
Nalini
| |
| Tuesday, February 21, 2006 - 4:18 pm: |
| 
|
मनुस्विनी, मी अहमदनगर जिल्ह्यातली आहे. पण भारतात गेल्यावर सर्वात आधी गोव्याला जाणार आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|