|
Dineshvs
| |
| Wednesday, October 05, 2005 - 3:06 pm: |
|
|
गहु आठ दहा तास पाण्याय भिजवुन सावलीत वाळवावा. मग हलकेच कुटुन पखडुन घ्यावा. २ कप गहु असतील तर ४ कांदे ऊभे चिरुन घ्यावेत. धणे जिरे यांची ताजी पुड दोन चमचे घ्यावी. तुप तापवुन त्यात ऊभे चिरलेले कांदे कुरकुरीत तळुन बाहेर काढावेत. त्यातच आणखी दोन कांदे बारिक कापुन घालावेत. दोन मोठे चमचे आले लसणाचे वाटण परतावे. मग त्यात धणे जिरे पुड, हळद घालुन अर्धा किलो मटणाचे तुकडे घालावेत. थोडे परतुन लाल तिखट घालावे. मग कांडलेले गहु घालावेत. मीठ घालावे आठ दहा कप पाणी घालुन अगदी मंद आचेवर तीन साडेतीन तास ठेवावे. लागले तर थोडे पाणी घालावे. सगळे शिजुन लगदा झाला पाहिजे. वरुन ऊकडलेल्या अंड्याचा चुरा, तळुन ठेवलेला कांदा आणि तुप घालुन खावा. एवढे खाऊन दिवसभर ऊपास केला तर काहि बिघडत नाही.
|
दिनेश, काही basic प्रश्ण : ह्या पदार्थात पुढिल प्रमाणे substitutions केली तर चालतील का? १. मटणा ऐवजी चिकन. २. कांडलेल्या गव्हा ऐवजी coarse cream of wheat . (हा दलिया सारखा दिसतो. whole wheat चा आहे. साखर घातलेला नाही. ) ३. कुकर मध्ये शिजवलं तर चालेल का? चवित फ़रक पडेल हे माहित आहे, पण substitutions करुन हा पदार्थ करणं मला जास्ति सोप्पं पडेल
|
Dineshvs
| |
| Thursday, October 06, 2005 - 2:56 pm: |
|
|
हो, सगळे पर्याय योग्य आहेत. कुकरला प्रेशर आले कि साधारण पन्^नास मिनीटात हे शिजेल. पाणी पुरेसे हवे. तरिही बाहेर शिजवायची मजा त्यात नाही. असाच एक नल्ली नेहारी, नावाचा प्रकार असतो.
|
Sunilt
| |
| Friday, October 07, 2005 - 6:50 am: |
|
|
मटणा ऐवजी चिकन वापरले तरी तीन साडेतीन तास शिजवावे लागेल
|
नाही, माझ्या अंदाजे चिकन वपरलं तर एक ते दीड तासात होइल.
|
Dineshvs
| |
| Friday, October 07, 2005 - 2:43 pm: |
|
|
चिकन लवकर शिजेल, पण मला वाटते या प्रकाराला मटणच वापरावे. मस्कत मधे पण असा एक प्रकार करतात. त्यात ते मासा घालतात. आणि लाल भोपळा घालतात. वरुन तुप घेतात.
|
दिनेश, रेसिपी करता धन्यवाद. पुण्य, इथले जे भारतिय मुस्लिम आहेत ते आधी मटण शिजवून गव्हा ऐवजी ओटस वापरतात. मी कधिहि हा पदार्था पहिलेला नाही पण चर्चा ऐकली आहे.
|
Shonoo
| |
| Wednesday, November 16, 2005 - 1:27 pm: |
|
|
If you are in the US, you can find National brand Haleem Mix ( not just the masala, but the whole mix which includes several daals, grains etc) . You can follow the packet directions - substituting pressure cooker for several hours of slow cooking. Fattier cuts of mutton are usually favored. A pakistani student used to make this when I was a student. He would send word that we should eat a light breakfast, skip lunch and go to is place around 4:00 pm - in time for a Sunday evening football game :-) He would cook this as two separate dishes mutton haleem for us 'kafirs' and beef halim for everybody else, but both slow cooked and from scratch. Packet Mixes were again for us 'Kafirs'. He would serve it garnished with julienned ginger, fine sliced green chillies and lots of corriander and mint. Shalimar on Oak Tree road ( in Edison ) serves halim often - but it is not mutton halim.
|
Sunilt
| |
| Monday, January 02, 2006 - 12:31 pm: |
|
|
३१ डिसेंबरच्या शुभमुहुर्तावर हलीम केला. छान झाला. दिनेश ह्यांच्या रेसिपीत खालीलप्रमाणे किंचित फेरफार केला १) आद्ल्या रात्री पाव किलो गहू भिजत घातले. २) दुसर्या दिवशी ( सुमारे १० तासांनंतर्) ते सावलीत वाळत टाकले. ३) अर्ध्या किलो मटणाला १ चमचा धने पावडर, १ चमचा जिरे पावडर, २ चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा दालचिनी पावडर, १/२ चमचा लवंग पावडर, ६ चमचे लाल तिखट आणि ४ चमचे दही लावून सुमारे तासभर मुरवत ठेवले. ४) चार चमचे तेल तापवून त्यात एक कांदा चिरून लालसर होई पर्यंत परतला. ५) त्यात मुरवलेले मटण आणि थोडे पाणी घालून तासभर शिजवत ठेवले. ६) मधल्या वेळात, सुकलेले गहू कुटून घेतले. तसेच, तुपात चार उभे चिरलेले कांदे तळून घेतले. ७) तासभरात मटण शिजले. त्यात कुटलेले गहू आणि पाणी घालून सुमारे अडीच तास शिजवत ठेवले. अधून मधून पाणी घालत तसेच ढवळत राहिलो. चवी पुरते मीठ घातले. ८) अगदी लगदा झाल्यावर शिजवणे थांबवले. ९) वर तुपात तळलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून फस्त केले
|
Sunilt
| |
| Monday, January 02, 2006 - 12:48 pm: |
|
|
आणि हो, हलीम सोबत रक्त वारुणी (chantilli) ची संगत एक वेगळीच रंगत आणते हे सांगायला विसरलोच की !!!
|
Dineshvs
| |
| Monday, January 02, 2006 - 4:26 pm: |
|
|
हालिम हा प्रकार आताच बिगरमुस्लीम लोकाना माहित झाला आहे. पुर्वी तो आपल्या फ़ोडणीच्या भातासारखा, त्यांच्यापर्यंतच मर्यादित होता.
|
हलीमची पाककृती मस्तच. मी हैद्राबादेत आणि लखनऊ शहरात हा प्रकार खाल्ला होता.. --तात्या.
|
Sunilt
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:32 pm: |
|
|
वा देवगडकर तात्या ! हलीमच्या शोधात मनोगतावरून मायबोलीपर्यंत ?? खरे भक्त दिसता ??
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|