|
Prachee
| |
| Friday, April 18, 2008 - 10:55 am: |
| 
|
मैत्री, सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाळाला इतर बाळांशी compare करु नकोस. प्रत्येक बाळ वेगळे असते. काही लवकर पालथी पडतात, काही लवकर चालतात, बोलतात.....प्रत्येकाची वाढ वेगळी असते. जर बाळ खुप healthy असेल तर जरा उशीरा पालथे पडेल.... पण निराश होऊ नकोस, कोणी काही बोलले तर कानाडोळा कर. अजुन तो तसा बराच लहान आहे. हळुहळु करेल सगळे आणि मग त्या आनंदात सगळे मागचे विसरुन जाशील... आपले बाळ वाढताना बघण्यासारख़्हे सुख नाही जग़ात. तो आनंद वेगळाच असतो. आणि लवकरच तुलाही तो अनुभवायला मिळेल.
|
Maitri
| |
| Saturday, April 19, 2008 - 7:24 am: |
| 
|
dinesh dada, Lajo and prachee sagalyana dhanyawad! Ata baryapaiki lakshat alyat recipes , mi ithali pan charcha wachali. Chhanacha mahiti aahe.ani jara tumachay sagalyachay reply ne relax pan zale. prachee, tas comparison nahi ga karat pan jara ithe sangatat na ki aata palatha padayala pahije kinva doctor mhanale daat lavkar alet pan ajun jara tyala walawayacha prayatna kara mhanun vicharala upay. sagalyana punha ekda dhanyawad
|
Prachee
| |
| Saturday, April 19, 2008 - 8:53 am: |
| 
|
मैत्री, एक सल्ला देते. बाळाला जास्त अंगावरच खेळवु नकोस. त्याला शक्यतो खाली मोकळे जमिनीवर खेळायला सोडत जा. अर्थात, लक्ष ठेवुन रहा आणि साफ़सफ़ाई ठेवत जा, पण जेवढे मुलाला खाली सोडशील तेवढे त्याची वाढ लवकर होईल.
|
Maitri
| |
| Sunday, April 20, 2008 - 11:06 pm: |
| 
|
prachee, nakki lakhsat thevate mi he.
|
Maitri
| |
| Sunday, April 20, 2008 - 11:10 pm: |
| 
|
ithalya archives madhye sagalyat suruwatila dinesh dadani lihalay ki nachaniche satva deta yet balala. amachyakade nachaniche pith milate. te dudhat kinva formula madhey mix karun dila tar chalel ka?
|
Dineshvs
| |
| Monday, April 21, 2008 - 2:55 am: |
| 
|
मैत्री, नुसत्या नाचणीच्या पिठात भरपूर कोंडा असतो, ( सत्व काढताना कोंडा काढून टाकतात, त्याची कृति पण आहे इथे ) पिठ मैद्याच्या चाळणीने चाळुन वापरता येईल.
|
Varshac
| |
| Monday, April 21, 2008 - 3:17 pm: |
| 
|
मेत्री. नाचणीचे कच्चे पिठ न देता चांगले भाजुन मग दुधात मिक्स करुन दे.
|
Maitri
| |
| Saturday, May 03, 2008 - 12:12 am: |
| 
|
dhanyavaad dineshda ani varsha.
|
Shmt
| |
| Wednesday, May 07, 2008 - 10:29 pm: |
| 
|
माझ्या बाळाचे वजन कमी आहे. त्याचे हेमोग्लोबीन check केले ते normal आहे. तो ८ महिन्याच आहे. त्याला मी मऊ वरण भात, नाचणीची खीर, खीमट, वेगवेगळ्या भाज्या आणि फ़ळां ची puree देते. अजुन काय देता येइल त्याने त्याचे वजन वाढेल? दुध पोळी चालु केली आहे. धन्यवाद
|
Dineshvs
| |
| Thursday, May 08, 2008 - 2:44 am: |
| 
|
Shmt बाळ जर खेळत खिदळत असेल तर वजनाची काळजी करु नका. एकाजागी निपचित पडून राहणार्या वजनदार बाळापेक्षा सदा चुळबूळ करणारे बाळ, जास्त तंदुरुस्त असते. सगळीच बाळं वजनवाढीचा ठाराविक पॅटर्न पाळतातच असे नाही. आहार योग्यच आहे.
|
Aashu29
| |
| Thursday, May 08, 2008 - 4:23 am: |
| 
|
shmt थोडसं गाइचं तूप वरण भातात किंवा त्याच्या खाऊत घालत जा, उकडलेला बटाटा मी एक वर्षाखेरिस सुरु केला होता. थोडा पालक आणी भात एकत्र उकडुन त्याची पेज देउ शकते, पालक एवजी गजर किसलेले उकडलेले. मी हे सर्व ट्राय केलेय. हे सुरू कर ,बाळ मग बाळसे धरेल.
|
Aashu29
| |
| Thursday, May 08, 2008 - 4:27 am: |
| 
|
आणि दिवसाला एकच भाजि चा खुराक दे नाहितर बाळाला अजिर्ण होइल, दिवसात १ भाजि आणी १ फ़ळ, दुध भरपुर, बाकि इतर तु देतेस ते योग्यच आहे
|
Shmt
| |
| Thursday, May 08, 2008 - 8:44 pm: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा आणि आशु२९. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझे बाळ active आहे. पण सध्या त्याचे वजन खूपच कमी झाले आहे म्हणुन विचारते. पालकाने वजन वाढते का? अजुन असे कुठले पदार्थ आहेत ज्याने त्याचे वजन वाढायला मदत होइल? जसे: केळ
|
Dineshvs
| |
| Friday, May 09, 2008 - 3:21 am: |
| 
|
कोहळा, हा बलवृद्धीसाठी चांगला. तिथे मिळु शकेल का. त्याची खीर देता येईल. कोहळ्यापासून केलेले कुष्मांडपाक नावाचे एक औषध असते. ते जाणकारांच्या सल्ल्याने द्यावे. पिंपळी मिळत असेल तर वर्धमान पिंपळी प्रयोग जाणकारांच्या सल्ल्याने करता येईल. यात दूधात पिंपळी उकळून ते दूध देतात. अर्ध्या बदामापासून सुरवात करून, रोज तो उगाळून देता येईल. त्या बरोबर एक खारिक पण घ्यायची. बाळाची प्रतिक्रिया बघुनच हे प्रमाण वाढवायचे.
|
Ashwini
| |
| Friday, May 09, 2008 - 4:36 pm: |
| 
|
वर्धमान पिंपळी हा प्रयोग वजन वाढण्यासाठी करू नये. हे रसायन अतिशय तीक्ष्ण आणि उष्ण आहे. मोठ्या माणसांसाठीसुद्धा वैद्याने सुचवले तरच आणि त्यांच्या देखरेखीखाली करावे. ते कफज व्याधी आणि विशिष्ठ प्राणवह स्रोतसाच्या विकारात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करतात. इतक्या लहान बाळांना तितकेच तीव्र कारण असल्याशिवाय करू नये. बाकी गुटीमध्ये, खारीक, बदाम इ. ठीक आहे. भूक व्यवस्थित लागून खात पित असेल आणि छान खेळत असेल तर जास्त काळजी करू नये. भूक लागत नसेल, खाणे दुध पिणे कमी असेल आणि इतर काही लक्षणे नसतील तर सकाळी च्यवनप्राश अगदी चिमुटभर चाटवायला हरकत नाही. त्यानंतर अर्ध्या तासाने दुध पाजले पाहीजे. मध्ये काही देऊ नये.
|
मला १३ महिन्याची मुलगी आहे. तिला सध्या फ़ोर्मुला बन्द करुन होल मिल्क द्यायचा ट्राय करत आहे. पण तिला साधे दूध अज्जिबात आवडत नाहि. दिले कि लगेच उलटि करते.बरेच वेळा देउन बघितले. अगदी २-४ चमचे पन उलटून टाकते. भातात मिक्स करुन पन उलटी करते. कोणाकडे काही सल्ला आहे का?
|
Maitri
| |
| Monday, May 19, 2008 - 6:54 pm: |
| 
|
tumachya sagalyanchya madatimule aata baryacha goshti try karun baghitalyat ani maza mulaga baracha kahi khato aata. 6 mahinyacha aahe to aata, mi tyala mix veg ukadun mash karun ani tyat jirepud kinva dhane jire pud ghalun dete, lal bhopala, bhat, ravyacha shira bharapur tup ghalun dilela, Mixed fruit juice ghari karun dete. mala Dudhi bhopalyachya ekhadi recipe havi hoti tyachyasathi. kai deta yeil dudhi bhopalyacha? ani to rasmalai kinva shevayachi kheer yatala dudha pito avadine. Chalel ka atta ya vayat dudha dilela??? karan US madhale doctor sangatat ki dudh dyayacha nahi 1 varshaparyant, mhanun vicharlaa. Shivay tyat keshar, nutmeg, velachi sagala asat. tyala kahi tyacha tras hot nahiye , pan kunala kahi mahiti asel tar sangala ka please? Dhanyavaad. p.s. Hi family aahe mhanun agadi patkan manat alelya goshti vicharata yetat shivay salle milatat tyamule baryacha goshti sukhakar hotat.
|
Saket
| |
| Monday, May 19, 2008 - 8:32 pm: |
| 
|
मैत्री, मी माझ्या मुलीला दुधी भोपळ्याची भाजी मिक्सरमधुन प्युरी करुन देते. भाजी करताना फ़क्त तुप, जिरे, हिंगाची फ़ोडणी घालते आणि मग जिरेपुड आणि मीठ (किंचीत) घालते. तुझे बाळ ६ च महिन्याचे असल्यामुळे तु जिरे स्किप करु शकते कारण मिक्सरमधुन काढले तरी कधी-कधी जिरे एकदम बारिक नाही होत.
|
म्रुदुला! फ़ॉर्मुला बंद करुन साधे दुध सुरु करताना .. सुरवात २%मिल्कने करावी.. प्रमाणही कमी असावे..२ oz वैगरे. लहान मुल कुठलाही बदल पटकन सहन करतातच अस नाही..प्रयत्न सोडु नये पण, फ़ार जबरदस्तीही करु नये...
|
Situ
| |
| Monday, June 23, 2008 - 9:41 am: |
| 
|
mala 6 mahinyacha mulga aahe. tyachya khaoo madhye kamit kami kiti antar thevave. please sangal ka. yash la dhoodh biscuit khayala aavadate. khimati khatana khoop radto. situ
|
Dineshvs
| |
| Monday, June 23, 2008 - 10:06 am: |
| 
|
दोन खाण्यातले अंतर, बाळाची भूक आणि मूडवर अवलंबून राहील. साधारणपणे बहुतेक बाळं भूक लागली कि रडतातच. अजून बाळाचे रुटिन सेट व्हायला, काहि महिने जातील. खिमटी, कदाचित खुप घट्ट, वा गरम असेल. त्याची चव घेऊन पहा. चव आवडेपर्यंत प्रयोग करत रहायला हवेत. नवीन खाऊची सवय व्हायला, आवड निर्माण व्हायला वेळ लागतो. बिस्किटे देतानाही चांगल्या प्रतीची द्यावीत. बाळाला बहुतेक गोडाची आवड दिसतेय.
|
Situ
| |
| Monday, June 23, 2008 - 12:37 pm: |
| 
|
Dineshda, maahiti baddal dhanyavad. Me yash la Marrie Buiscuit dete. Vegali konti buiscuite dyavit ka. Tyane mhanave tase balse pan ghetale naahi. Tyachi prakruti ushnna aahe. Kahi Khaoo suchwal ka? Thanks, situ
|
Dineshvs
| |
| Monday, June 23, 2008 - 12:59 pm: |
| 
|
दूधात शिजवून राजगिर्याच्या लाह्या, नाचणी सत्व देता येईल. नारळाचे पाणी देता येईल. उकडलेले रताळे, भोपळा, कोहळा यांचा अगदी छोटासा तुकडा, दूधाबरोबर देता येईल. बाळाची आवड बघून तो पदार्थ परत द्यायचा. आणि आवडला नाही तरी, काहि दिवसानी परत द्यायचा प्रयत्न करायचा. बाजारात सोया, नाचणी वगैरीची बिस्किटे उपलब्ध आहेत. त्यातली अगदी अर्धा चमचा देऊन बघता येतील.
|
Situ
| |
| Tuesday, August 26, 2008 - 8:18 am: |
| 
|
८ महिन्याच्या बालाला जूलाब होत असतील तर दालीबाचे रस देऊ शत्क्तो का.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|