|
Bee
| |
| Tuesday, January 28, 2003 - 2:05 pm: |
| 
|
शेपू अगदी देठासहीत निवडून ध्यायची. देठ फ़ेकून ध्यायचा नाही. पाने फ़ार बारीक चिरायची गरज नाही. भाजी करण्यापुर्वी वाटीभर मुगाची दाळ भिजायला घालायची. मूगाची दाळ अगदी 10/15 mins मध्ये भिजते, फ़ार वेळ लागत नाही. नंतर कांदा आणि लसूण हवे तेव्हढे घ्यायचे, ताव्यावर तिखट, हळद, मोहरी, जीरे घालून परतवायचे. दाळ आणि भाजी एकजीव करून घ्यायची, थोडे मीठ घालायचे आणि नंतर ताव्यावर पसरून ध्यायचे. खोलगट ताट घेउन भाजी झाकून ठेवायची आणि दोन तीन मिनिटांनी अरत परत करायची. शेपूच्या भाजीचा aroma जाणावायला लागला की उतरवून ठेवायची. कमी आचेवर ठेवायला विसरू नका. शेपूची पाने फ़ार कोवळी असतात बिचारी, जास्त आच दिल्यास जळतात. post edited by moderator
|
Archananj
| |
| Tuesday, January 28, 2003 - 4:42 pm: |
| 
|
shepuchi bhaji pith perunahi karta yete.
|
शेपुच्या भाजीची अजुन एक पध्दत्: प्रथम फोडनी करावी, नतर त्यात हिरव्या मिरच्या,साधारण दोन मोठे कांदे बारीक इरून, पाव वाटी चण्याची डाळ (चण्याची डाळ साधारण एक तास तरी भिजवुन घ्यावी ) घालुन चांगले परातुन घ्यावे. नतर त्यात चिरलेला शेपु घालावा. ओला नारळ व थोडा गुळ घालावा. चवी पुरते मीठ घालावे. नतर त्यात थोडे पाणी घालुन भाजी शिजवुन घ्यावी.
|
आज ही भाजी घालून पराठा केला, मस्त लागला. बारीक चिरून, भरपूर कोथींबीर, बारीक कांदा, मिरची, गरम मसाला, आमचूर पॉवडर टाकून, थोडेसे उरलेले भाजणीचे थालीपीठीचे पीठ नी कणीक दही घालून घट्ट भिजवून मस्त लागला घट्ट दही व हिरवी चटणी.
|
Maanus
| |
| Monday, April 14, 2008 - 3:21 pm: |
| 
|

|
माणसा, नको तिथे नको त्या गोष्टीसाठी बीबी वापरू नये. हा जोकचा बीबी नाही.
|
Sunidhee
| |
| Wednesday, May 21, 2008 - 7:58 pm: |
| 
|
मनुस्विनि, तु कांदा, शेपू वगैरे सर्व सरळ कणकेत घालून मळलेस का, की कांदा, शेपू थोडे परतून घेतलेस?
|
नाही कच्चेच.(हे चार शब्द.. झाले.)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|