|
Ksmita
| |
| Friday, May 18, 2007 - 1:01 am: |
| 
|
मंडळी वरच्या सगळ्या टीप्स कामी आल्या धन्यवाद परवाच इडली केली आणि काय आश्चर्य छान मऊ नरम झाली दिवसभर माझे मीच कौतुक करत होते १ वाटी उडीद डाळ २ वाटी इडली रवा असे प्रमाण घेतले मूठभर पातळ पोहे भिजवून घातले पिठात इडली करायच्या वेळी अन चवीपुरते मीठ साधारण ५ ते ६ मिनिटे microwave oven मधे ठेवला स्टंन्ड मस्त मऊ जाळीदार इडली तयार !! I hope everytime Idalis' come like this .......
|
Nayana
| |
| Wednesday, December 26, 2007 - 5:28 pm: |
| 
|
माझी इडली जरा yellowish color ची होते ती पांधरी शुभ्र होण्यासाठी काय करावे?
|
Dineshvs
| |
| Thursday, December 27, 2007 - 3:02 am: |
| 
|
इडलीचा रंग अर्थातच तांदळावर अवलंबुन आहे. लाल वा उकडा तांदुळ वापरला तर पिवळसर रंग येतो. सोडा जास्त झाला तरही पिवळसर रंग येतो. तांदळामुळेच येत असेल आणि चव चांगली असेल तर पिवळ्या रंगाची काळजी सोडावी. उलट त्यात भाज्या वगैरे घालुन जास्तच रंगीत करावी.
|
Bee
| |
| Wednesday, May 14, 2008 - 5:29 am: |
| 
|
ब्राऊन राईस वापरुण केलेल्या इडल्या छान होतात का? मला करून पहायच्या आहेत.
|
मस्त पांढर्या शुभ्र इडल्या होण्यासाठी मी(अर्थात माझी आईने सांगीतले) जास्मीन राईस वापरायचा. मी हे प्रमाण घेते, 11/2 वाटी बासमती जुना(सफ़ेद), 1/2 वाटी जास्मीन राईस(जुना), सात आठ मेथी दाणे, मूठीभर पातळ पोहे नाहीतर शिजवलेला(रात्रीचा असेल तर उत्तम) नरम भात, पाव वाटी अक्खी उडीद डाळ(साली काढलेली) 7-8 तास separate भिजवून मग वाटलेल्या तांदूळात आंबवायची. उगाच ते yeast वगैरे टाकायची काहीही गरज नसते असे प्रमाण घेतले तर. हमखास मऊ,शुभ्र इडली तयार. बी, वरचेचे प्रमाण घेरे brown rice च्या इडली साठी, सफ़ेद बासमती एवजी brown वापर. होतात छान. मी केल्या आहेत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|