Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मसाले

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » मसाले » मसाले « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 28, 200534 11-28-05  7:05 pm
Archive through May 22, 200620 05-22-06  3:32 pm
Archive through June 01, 200620 06-01-06  2:55 pm
Archive through October 03, 200720 10-03-07  5:56 am

Dineshvs
Friday, October 05, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलाव आणि बिर्यानीसाठी शक्यतो ताजा मसाला केला तर वास छान लागतो.
एक साधारण कुठल्याही पुलावाला चालेल असा मसाला देत आहे.
पाव वाटी धणे,
एक चहाचा चमचा जिरे,
मिरी आठ दहा, लवंगा दोन तीन, शहाजिरे अर्धा चमचा, एक इंच दालचिनी, एक चमचा बडिशेप, अर्धा चमचा मेथी, दोन चमचे खसखस, पाव जायफळ, एखादी मोठी वेलची व दोनतीन लहान वेलची
हे सगळे भाजुन त्यात हिंग हळद घालुन बारिक करावे. यात एखादा घटक कमीजास्त असला तरी चालतो.
फ़ोडणीला वेगळा मसाला घ्यावा व त्यात तमालपत्र घ्यावे.


Jagu
Monday, October 08, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, पुलाव आणि बिर्यानीसाठी मसाल्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

Dineshvs
Thursday, October 11, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरात घरोघरी असा मसाला केला जातो. कांदा लसुण मसाला हे जरी बाजारातले नाव असले तरी, कोल्हापुरमधे या मसाल्याला चटणी म्हणतात.
हा खर्‍या अर्थाने ऑल पर्पज मसाला आहे. हा रोजच्या भाजी आमटीत वापरला जातो. आणि हा मसाला घातला, कि बाकि काहिही, अगदी कोथिंबीर घालायचीदेखील गरज उरत नाही.

प्रत्येक गृहिणीचे खास असे प्रमाण असते, शिवाय जिन्नस किती खमंग भाजले गेले यावरदेखील या मसाल्याची चव ठरते. पण एवढे मात्र नक्की कि घरगुति मसाला आणि बाजारात मिळणारा तयार मसाला याच्या चवीत खुपच फरक असतो. हॉटेलमधे जो व्हेज कोल्हापुरी नावाचा तिखटजाळ प्रकार मिळतो, तो खास बाजारीच आहे, कोल्हापुरमधल्या घरोघरी जे जेवण शिजवले जाते, ते मसालेदार आणि चविष्ठ असते, खचितच तिखटजाळ नसते.

सोबतचे प्रमाण देतोय, ते एक वानगी म्हणुन. प्रत्येकाच्या आवडीनुसार थोडेफ़ार बदल संभवतात.

यातले जिन्नस तळण्याबरोबर बाकिच्या क्रिया पण महत्वाच्या आहेत. हा मसाला डंकावर कुटला जातो. कधीकधी केवळ मिरच्या कुटुन आणतात, व बाकिचा मसाला घरी कुटुन त्यात मिसळतात. त्यासाठी घरातच एक खास दगड बसवलेला असतो.

वर्षभराच्या बेगमीसाठी करताना, या प्रमाणात आणि इतके घटक पदार्थ जमा करणे शक्य होते, पण छोट्या प्रमाणात करायचा असल्यास, सगळे घटक नाही घेतले तरी चालतील. मग अश्यावेळी चवीचा लसावि काढुन केलेला बाजारी मसालाच वापरणे योग्य ठरते.

या मसाल्यातले ओले जिन्नस बघता, कोकणातल्या दमट हवेत तो वर्षभर टिकु शकत नाही, पण कोल्हापुरच्या थंड आणि कोरड्या हवेत मात्र तो वर्षभर छान टिकतो. क्वचित त्यात टिकण्यासाठी बिब्बे घालायची पद्धत आहे.

तर आता याचे घटक.
प्रत्येकी अर्धा किलो ब्याडगी मिरच्या, शंकेश्वरी मिरच्या, सुके खोबरे आणि तेल.
प्रत्येकी अर्धी वाटी, धणे, तीळ, खसखस आणि मोहरी.
दोन हळकुंडे आणि सुपारीभर होईल असा हिंगाचा खडा.

प्रत्येकी ५० ग्रॅम, लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरे आणि वेलदोडे.
आवडीप्रमाणे कमीजास्त. वेलदोडे मसाल्याचे किंवा साधे किंवा दोन्ही घ्यावेत.

दोन तीन चक्रीफ़ुले, तीनचार दगडफ़ुले, आठदहा नाकेश्वर, एक चमचा मेथ्या, आठदहा तमालपत्रे,
पाव किलो आले, अर्धी जुडी कोथिंबीर ( पाने खुडुन जरा सुकवुन वाटीभर होतील इतकी ) सात आठ मोठे कांदे, एक दोन मोठ्या गड्ड्या लसुण, पाव किलो मीठ.
मिरच्यासकट सगळे सुके जिन्नस जरा उन्हात वाळवुन घ्यावेत. कांदे उभे चिरुन जरा उन्हात वाळवावेत. कोथिंबीर खुडुन पेपरवर पसरुन घ्यावी.
लसुण सोलुन घ्यावा. आल्याची साले काढुन पातळ काप करावे. सुके खोबरे किसुन घ्यावे.

मिरच्यांची देठे खुडुन त्या कुटुन घ्याव्यात.
धणे, तीळ, खसखस, मोहरी, मेथी, खोबर्‍याचा किस कोरडा भाजुन घ्यावा.
थोड्या तेलावर बाकिचे मसाले व हिंग तळुन घ्यावा.
मग तेलावर कांदा अगदी लाल होईपर्यंत परतावा. त्यातच आल्याचे तुकडे, ठेचलेला लसुण, खुडलेली कोथिंबीर घालुन जरा परतावे.
मग सगळ्याची पुड करुन मिसळुन ठेवावी. त्यातच मीठ घालावे.

वर लिहिल्याप्रमाणे थोड्या प्रमाणात करायचा असेल तर एवढे सगळे करणे शक्य होत नाही. त्यावेळी केवळ कांदा परतुन त्यात आले लसुन व तिखट घालुन परतले आणि वरुन गरम मसाला घातला, तर जवळपास जाणारी चव येऊ शकते.



Manuswini
Saturday, October 13, 2007 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पुढच्या वेळी भारतात गेले की मी स्वतः हा मसाला घरी करून आणणार आहे.

Radek
Monday, November 19, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती कोणितरी coffee grinder आणि मसाल्या बद्दल लिहिले आहे. coffee grinder मध्ये मसाला करुन झाला कि मग त्यात एक ब्रेड slice grind करायचा. मसाल्याचा वास निघुन जातो

खूप पुर्वी Food Network वर Alton Brown ने ही टीप सान्गित्ल्याच आठवतय.


Prr
Thursday, December 27, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Fruit चाट ची recipi माहित आहे का?

Iravatir
Friday, January 18, 2008 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazykade malvani garam masala ahe.Mala malvani neg bhajya kashya karayachya te sanga.

Prr
Friday, February 29, 2008 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारवारी मसाला : १०० ग्रॅम लाल मिरची, अधीर् वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी मेथी, एक वाटी मिरी, पाच चमचे हळद, २०० ग्रॅम धणे, अधीर् वाटी मोहरी, एक वाटी तीळ, अधीर् वाटी चण्याची डाळ.एका भांड्यात हे सर्व टाकून मंद आंचेवर भाजून त्याची बारीक पावडर करावी. हा मसाला कुठलीही डाळ करून त्यात टाकावा.
सारस्वत मसाला : अर्धा किलो मिरची (लाल) सुखी, तीन चमचे जिरं, तीन चमचे मिरी, एक चमचा लवंग, एक चमचा बडीशेप, अधीर् वाटी दगडफुल, एक जायफळ, तीन चमचे हळद.हे सर्व मंद आंचेवर भाजून त्याची बारीक पावडर करून बाटलीत भरून ठेवावी. हा मसाला कुठलाही प्रकारचे मासे करायचे असतील तर त्याची चव खूप चांगली लागतो.

गरम मसाला : ५० ग्रॅम दालचिनी, ५० ग्रॅम तमालपत्र, ५० ग्रॅम वेलची, ५० ग्रॅम जावेत्री, ५० ग्रॅम लवंग, ५० ग्रॅम बडीशेप, ५० ग्रॅम गुलाबफुल, ५० ग्रॅम दगडफुल, ५०० ग्रॅम जिरं, ५०० ग्रॅम धणे, ५० ग्रॅम काळीमीरी, ५० ग्रॅम सुंठ. जिरं आणि धणे भाजून घ्यावेत नंतर बाकी सर्व साहित्य भाजून घेऊन थंड झाल्यावर सर्व एकत्र करून बारीक पावडर करावी, हा मसाला तुम्ही नेहमीच्या जेवणात तंदुरी चिकनमध्ये किंवा बिर्याणीमध्ये वापरला तर ती खूप चविष्ट होते.
कोकणी मसाला : एक किलो लाल सुकी मिरची, अर्धा किलो धणे, अर्धा वाटी लवंग, अर्धा वाटी बडीशेप, पाऊण वाटी वेलची, एक वाटी काळीमीरी, अधीर् वाटी मोहरी, एक वाटी जिरं, एक जायफळ, एक चमचा हिंग, एक वाटी खसखस, एक चमचा मेथी. हे सर्व मंद आंचेवर भाजून थंड झाल्यावर बारीक पावडर करावी. हा मसाला मटण, चिकन आणि माशांमध्ये टाकावा. जास्त करून कोकणात हा मसाला वापरतात.
मालवणी मसाला : एक किलो सुक्या मिरच्या, अधीर् किलो धणे, अधीर् वाटी मिरी, एक वाटी बडीशेप, अधीर् वाटी जिरं, अधीर् वाटी दालचिनी, दोन वाट्या दगडफुल, दोन वाटी मोहरी, तीन चमचे हळद, पाऊण वाटी जावेत्री, एक जायफळ, एक चमचा हिंग. मिरची आणि धणे मंद आंचेवर भाजून घ्यावेत. नंतर बाकी सर्व साहित्य वेगळं भाजून घ्यावं. थंड झाल्यावर बारीक करून बाटलीत भरून ठेवावं. हे वेगवेगळे भाजून घेतले कारण मिरची आणि धणे यांचा सुगंध जास्त काळासाठी राहतो. हा मसाला नॉन-व्हेजमध्ये आणि व्हेजमध्ये वापरतात. भरली वांगी, भरलेली तोंडली अशा डिशेशमध्ये हा मसाला खूप चांगला लागतो.
कढई मसाला : अर्धा किलो सुकी लाल मिरची, एक वाटी धणे, एक वाटी किळीमीरी, एक वाटी जिरं, दोन वाटी बडीशेप. हे सर्व साहित्य मिक्चरमध्ये बारीक करावं. पण याची एकदम बारीक पावडर करून नये. जरा जाडसर असावेत. हा मसाला पनीर कढई, चिकन कढई, मटण कढई किंवा व्हेज कढई करताना टाकावा.
कबाब मसाला : एक वाटी लाल सुकी मिरची, अधीर् वाटी धणे, अधीर् वाटी काळीमीरी, अधीर् वाटी शाही जिरं, पाऊण वाटी जावेत्री, पाऊण वाटी दगडफुल, एक चमचा जाडं मीठ. हे सर्व बारीक करून हा मसाला कोणत्याही प्रकारचे कबाब करताना टाकावा. हा मसाला टाकून केलेले कबाब जर कोळश्यावर भाजले तर खूप चविष्ट बनतात.
तंदुरी मसाला : जिरं ५० ग्रॅॅम, धणे ५० ग्रॅम, काळं मीठ एक चमचा, दोन चमचे कस्तुरी मेथी, दोन चमचे गरम मसाला. हा सर्व मसाला पावडर करून तंदुरी मसाल्यात वापरल्यास वेगळा चव येईल.
(Source -महाराष्र्ट टाईम्स )

Prr
Wednesday, March 05, 2008 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरवा मसाला : पालक पाच जुडी, कोथिंबीर एक जुडी, दोन लसूण, आलं ५० ग्रॅम, १०-१२ हिरव्या मिरच्या, दोन चमचे गरम मसाला, मीठ.
एक भांड्यात पालक उकळवून घेऊन थंड करून, पालकाबरोबर सर्व साहित्य टाकून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. हा मसाला दोन दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये चांगला राहू शकतो.



Shailaja
Thursday, March 06, 2008 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prr, प्लिज मला गोडा मसाल्याचे प्रमाण सांगा

Sonalisl
Thursday, March 06, 2008 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथेच वरती मुडी ने दिले आहे गोडा मसाल्याचे प्रमाण. * जरा वाचायचे कष्ट घे की :-).... .. .....दिवे घे.


Shailaja
Friday, March 07, 2008 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे मला तरी कुठे गोडा मसाल्याचे प्रमाण दिसत नाहिये!!

Ami79
Saturday, March 08, 2008 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पालक मसाला कोणत्या पदर्थात वापरतात?

Sonalisl
Monday, March 10, 2008 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलजा, ही घे कृती....
गोडा / काळा मसाला.
साहित्य : २ वाटी धणे, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी सुके खोबरे कीस, प्रत्येकी १ मोठा चमचा लवंग, काळी मिरी, वेलदोडे, ८ ते १० मसाला वेलच्या, २ चमचे दालचिनी तुकडे, ५ ते ६ तमालपत्रे, १ चमचा दगडफूल, अर्धा चमचा नागकेशर, अर्धे जायफळ, अर्धा चमचा जायपत्री, हिंग, २ चमचे हरबरा डाळ, २ चमचे खसखस, २ चमचे जीरे, तेल.

कृती : थोड्या तेलावर हिंग टाकुन सर्व मसाले परतुन बाजुला काढुन ठेवावे. शेवटी खसखस, खोबरे अन तीळ भाजुन परतुन मग सर्व एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करावे.

वाटल्यास याच्यात तीळ अन खोबरे, जायपत्री नाही घातले तरी चालेल, कारण नंतर या मसाल्याला तेल सुटु शकते.

अन तिखट अंदाजाने हवे तेवढ्यात मिसळुन हलवुन घे. ओला हात लागु द्यायचा नाही.


Prr
Tuesday, March 11, 2008 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Ami79 ...
हिरव्या मसाल्याच्या डिशेश

Shailaja
Thursday, March 13, 2008 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Sonali या मसाल्यात हरबरा डाळ घालतात हे माहित नव्हते

Prarthana
Wednesday, March 26, 2008 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरम मसाल्यात चक्री फूलही घालतात. ते बी सकट घालायचे की बी काढून

Dineshvs
Wednesday, March 26, 2008 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी सकट वापरायचे. बियाना पण स्वाद असतो.

Zakasrao
Wednesday, March 26, 2008 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी सकट वापरायचे. बियाना पण स्वाद असतो. >>>>>
झकास लागतात त्या बिया :-)
तस बघायला गेल तर दालचिनी देखील थोडी थोडी खायला छान लागते :-)


Nkashi
Thursday, March 27, 2008 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासा, बायको अजुन माहेरुन आली नाही वाट्ट
तिखट मीठाची लापशी सोडुन डिरेक्ट गरम मसाले....


Manuruchi
Saturday, October 04, 2008 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala Malvani masala karayacha aahe tari krupya Kilo Gram madhe praman sangave. pahilandach karnar aslyamule vati aivaji vajnan praman have aahe .

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators