|
Sai
| |
| Friday, October 06, 2006 - 3:49 pm: |
| 
|
उडिदा ला मोड कसे आणायचे? म्हणजे उडिद डाळच वापरायची ना? आणि किती वेळ भिजवायचे?
|
Surabhi
| |
| Friday, October 06, 2006 - 3:54 pm: |
| 
|
डाळीला कसे मोड येणार? अख्खे उडीद वापरावे लागतील सई!
|
Sai
| |
| Friday, October 06, 2006 - 4:02 pm: |
| 
|
माझा गोन्धळ होतोय अख्खे उडिद म्हणजे दुकानात काय म्हणुन मिळतात? मला गोटा आनि स्प्लिट असे दोनच प्रकार माहित आहेत (
|
Mrinmayee
| |
| Friday, October 06, 2006 - 4:07 pm: |
| 
|
सुरभी, भरपूर लांब मोड आलेल्या मुगाला गरम पाण्यात घातल्यावर तीन चतुर्थांश दाण्यांची सालं तर सुटून येतात. पाण्यावर तरंगणारी सालं हातानी (नाहीतर गाळणीनी) काढून टाकता येतात. सालं टाकून द्यावी लागतात बिरडं करताना. हो, सत्व तर वाया जातात. पण एरवी तर आमटी, उसळी करताना आपण सालं नाही ना काढत, मग एकदा फक्त बिरड्यासाठी कन्सेशन!! ताटात मुग काढून घेऊन त्यातले सालासगटचे बाजुला करावेत. आणि उरलेले परत गरम पाण्यात टाकून ठेवावेत. थोडे थोडे बाहेर घेऊन TV वर आवडता कार्यक्रम बघत बघत सोलावेत. सई, उडदाला देखील मुगाप्रमाणेच मोड आणतात. रात्रभर पाण्यात भिजवून, दुसर्यादिवशी उडिद (अर्थात अख्खे) उपसायचे. घट्ट डब्यात किंवा फडक्यात गुंडाळून अंधारलेल्या जागी ठेवायचे. हिवाळ्यात वेळ लागतो मोड यायला. हिटरच्या जवळपास ठेवले तर बरं. आर्च, मुग, उडिद आणि चण्याच्या बिरड्याचा मसाला आईनी दिलेला वापरते. पण तो नसेल तर थोडा गरम मसाला टाकून चांगलं होतं बिरडं.
|
Sai
| |
| Friday, October 06, 2006 - 4:11 pm: |
| 
|
Thanks म्रुण्मयी पण अख्खे उडीद कसे दिसतात?
|
मृण्मयी मस्त आहे मुगाचं बिरड मी करुन पाहते आता.
|
Mrinmayee
| |
| Friday, October 06, 2006 - 4:51 pm: |
| 
|
सई, हे बघ अख्खे उडिद. डाळ पण आहे बाजुला. वरदा, वाटीभर पाठव इकडे. रोज असेल जेवणात तरी चालतं!  
|
Manuswini
| |
| Friday, October 06, 2006 - 5:05 pm: |
| 
|
सई, तु मारुतीला उडीद नाही वहात अख्खे उडीद?
|
Sai
| |
| Monday, October 09, 2006 - 1:15 pm: |
| 
|
Thanks !! म्रुण्मयी!!! आता मी आमच्या इथे एक शोध मोहिम सुरु करते आणि मनःस्विनि अग कुठ्ल्या देवाला काय वाहतात या विषयावर माझे ज्ञान तसे थोडे कमीच आहे ना!!!!!
|
Prarthana
| |
| Monday, November 13, 2006 - 6:37 am: |
| 
|
म्रिण्मयी, बिरड्याच्या मसाल्यात कोण्-कोणते पदार्थ असतात
|
Mrinmayee
| |
| Monday, November 13, 2006 - 1:46 pm: |
| 
|
प्रार्थना, एरवी वालाच्या बिरड्याला तर जीरं पूड आणि लवंग, दालचिनी पुड (आर्थात हळद तिखट पण) खेरीज काही लागंत नाही. पण चणे, उडीद आणि मुगाच्या बिरड्यात मी जो आईनी दिलेला मसाला घालते त्यात सगळेच घटक असता. (धणे, जीरे, मीरे, बडीशेप, लवंग, दालचिनी, तमालपत्र, दगडफुल, नाकेशर, मोठी काळी विलायची, कर्णफुल, खोबरं, लाल मिरच्या, खडा हिंग आणि शहाजीरं)
|
Zee
| |
| Monday, November 13, 2006 - 3:39 pm: |
| 
|
मृण्मयी, ऊडीदाचे ही बिरडे असेच करतात का? मी वरच्या पोस्ट्स वाचल्या, पण नक्क्की कळले नाही. thanks in advance.
|
Mrinmayee
| |
| Monday, November 13, 2006 - 3:47 pm: |
| 
|
मुग, चणे आणि उडिद या तीनही कडधान्याचं बिरडं एकाच प्रकारे करता येतं. ही लिंक: /hitguj/messages/103383/117508.html?1160149481
|
Zee
| |
| Thursday, November 16, 2006 - 3:59 pm: |
| 
|
मला इथल्या सर्व जाणकारांना एक विचारायचे होते की, वाल कडवे असतात म्हणुन आपण सोलतो ना?? मुग ऊडिद, चणे सोलुनच बिरडे करायचे असते का?? एक भा. प्र..
|
Dineshvs
| |
| Thursday, November 16, 2006 - 4:49 pm: |
| 
|
या कडधान्याची सालु कडु तर असतातच आणि ती जरा जाडहि असतात, म्हणुन ती सोलायची असतात. मुगाची पण सोलतात. नाही सोलली तर शिजताना वेगळी होतात. चण्याचीहि काढली तर चालतील, उडदाची काढावीच लागतील.आपल्याप्रमाणे आखाती देशात काबुली चणे भिजवुन सोलुन घ्यायची पद्धत आहे.
|
Prarthana
| |
| Friday, November 17, 2006 - 5:16 am: |
| 
|
थँक्स म्रिन्मयी मी वालाचे बिरडे असे करते साहित्य मोड आलेले वाल किंवा भिजवलेली वालाचि डाळ फ़ोडणीचे साहित्य ओवा व गूळ कोथिंबीर क्रुती भिजवलेले वाल किँवा वालाची डाळ नेहेमिप्रमाणे फ़ोड्णी करून त्यावर टाकावे. फ़ोडणीतच चमचाभर ओवा घालावा. जरासे शिजल्यावर तिखट मीठ व गूळ घालावा. वरून कोथिम्बीर पेरावी. आवडत असल्यास कांदा लसूण आल्याची पेस्ट ओवा घातल्या नंतर फ़ोडणीवर परतून घावी.
|
Prarthana
| |
| Friday, November 17, 2006 - 5:18 am: |
| 
|
बिरड्याच्या फ़ोड्णीत जीरे खोबरेही घालावे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|