|
Karadkar
| |
| Tuesday, May 29, 2007 - 4:53 pm: |
| 
|
बट्या आणि बाटी एकच की वेगवेगळी? मी भुसावळ मधे खाल्ली वरण आणि अमसुलाच्या कढीबरोबर. तो हाच पदार्थ का?
|
Shyamli
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:11 pm: |
| 
|
ही घ्या डाळ बाटी वाटीत डाळ,(म्हणजे आमटी):D बाजुला दिसतायत त्या बाट्या or बट्ट्या दुस-या वाटीत रबडी आहे वाटत :P सुनीती तू म्हणतीयेस ते चकोल्या किंवा वरणफळ ग! 
|
कराडकर ! हो बाटी आणी बट्ट्या एकच...करायच्या पद्धती बर्याच आहेत.. सुनितीने लिहलेल्या तुपाच्या बट्ट्या हया जास्त करुन नाष्त्याला केले जातात...पार्टी किंवा मोठ्या प्रमाणात करायला दिनेशदाने लिहलेय तस किंवा दालवाफ़ले पद्धतिने कराव्या. श्यामलीनेपण छान माहिती लिहलय..बट्ट्या खुस्खुशित होणे मह्त्वाचे..कडक झालिच तर सरळ मिक्सर मधुन काढावे..तुप आणी साखर किंवा गुळ घालुन लाडु वळावे.
|
Karadkar
| |
| Tuesday, May 29, 2007 - 7:53 pm: |
| 
|
धन्यवाद शामलि!! हेच खाल्ले होते मी. इथे BBQ मधे करुन पहायला हरकत नाही.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:12 pm: |
| 
|
श्यामली फोटो कुठला आहे ? वाटीत तुप आहे असे वाटतेय. बाट्यांबरोबर तुप देतातच. मला साधे वरण आणि हिरव्या मिरचीची चटणी, या बरोबर बाट्या आवडतात. मी उदयपुरजवळच्या एका ढाब्यावर बाट्या कुस्करुन त्यात साखर घालुन केलेला एक प्रकार खाल्ला होता. त्याला तो ढाबावाला चुरमा म्हणाला होता. खुपच छान लागतो तो प्रकार. पण एक वाटीभर खाल्ला तर पापण्या जड होतात.
|
Shyamli
| |
| Friday, January 18, 2008 - 8:59 am: |
| 
|
भाजायची सोय नसेल तर एका मोठ्या पातेल्यात पाणि उकळत ठेवायच आणि रोवळीला तूप लावून त्यात या बट्ट्या ठेवायच्या वर झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या. नंतर अर्ध्या करून तेलात तळून घ्यायच्या. या बट्ट्याही छान लागतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|