Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Gharche saajuk tup

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » Gharche saajuk tup « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 13, 200435 10-13-04  6:25 pm
Archive through March 21, 200625 03-21-06  10:29 pm
Archive through March 24, 200620 03-24-06  4:51 pm
Archive through May 24, 200720 05-24-07  4:35 am

Shailaja
Thursday, May 31, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद शर्मिला
आता मला आठ्वले की आई नेहमी का म्हणते की लोणी २-३ वेळा धुवायचे असते ते. तसेच तु जे न विरघळ्लेले सायीचे तुकडे म्हणतेस
त्याला आम्ही "धसकट" म्हणतो !

Manjud
Friday, June 15, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे बाहेर जे लोणी विकत मिळते त्याला एक वेगळाच वास येतो. (मला तरी येतो psychologically ). ते लोणी वापरून जर तुप कढवायचे असेल तर तो वास घालवण्यासाठी दिनेशदा काय करायचे?

आम्ही रोज भरपुर दुध घेतो, साय साठवुन विरजण लावुन रोज ताक करतो. तरिही घरी दही, लोणी, तुप ह्या सगळ्याला भरपुर खप असल्याने असल्या भानगडी कराव्या लागतात. विकतचे लोणी आणुन तुप करायचे नाही कारण त्याला वास येतो आणि लोणी, तुप खाण्यात काटकसर करायची नाही. मग काय करायचे अश्या वेळी?


Dineshvs
Friday, June 15, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाहेरचेही लोणी नीट कढवले तर तो वास जातो. लोण्याला येणारा वास खुपवेळा गायी म्हशीच्या खाद्यावर पण अवलंबुन असतो.
तरिही कढवताना, विड्याचे पान, हळदीचे पान, कढिपत्ता, वैगरे घातले तर तो वास जातो. मिठाचा एखादा कणही वास घालवतो.



Aditi
Wednesday, August 29, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल मी लोणी कढवले. नेहेमीप्रमाणे वास आणि पाण्याच्या थेंबाच्या परिक्षेनंतर गस बंद केला. तूप ओतून ठेवले. सुंदर कणि पडली. पण... तूपची चव आंबट लागते आहे.
काय झाले असेल कोणि सांगू शकेल का तूप नीट कढले नाही का


Prachee
Saturday, January 05, 2008 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज नेहमीप्रमाणे लोणी कढवले. फ़ेस दिसेनासा झाला. अगदी तळ दिसु लागला. पाण्याचे थेंब टाकुन पाहिले तर आवाज आला नाही म्हणुन थोडं अजुन कढवले तर एकदम फ़ेसच आला तुपावर,तो कमीच होईना. अगदी साबणाच्या फ़ेसासारखा फ़ेस. असे झाल्यास काय करावे? कशामुळे झाले असेल?

Dineshvs
Saturday, January 05, 2008 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आच अगदी मंद होती. त्यामुळे टाकलेल्या पाण्याची पटकन वाफ़ झाली नाही. नंतर आलेला फ़ेस त्या पाण्याच्या वाफ़ेचा होता.
तसे काहि गैर नाही. हा फ़ेस आपोआप खाली बसेल.


Dineshvs
Saturday, January 05, 2008 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदिती, मुळातच लोणी खवट असेल तर असे होईल.

Prachee
Saturday, January 05, 2008 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, धन्यवाद लगेचच उत्तर दिल्याबद्दल....

Sonchafa
Monday, April 14, 2008 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राची, लोण्यातली साय लोणी कढवताना काळी होते आणि तळाशी बसते. त्याची चव मला तरी थोडीशी आंबटच लागते.. जर लोणी पुरेसे धुतले नसेल तर लोण्यात ताकाचा अंश राहिल्याने कढवल्यावर तूप आंबट लागू शकेल असे मला वाटते.. आणि दिनेश म्हणतात त्याप्रमाणे मुळात लोणीही खवट असेल.. असो. पोस्ट लिहीत आहे तोवर तुझे ते आंबट तूप संपूनही गेलं असेल..

पण तूप कढवण्याची दुसरी एक पद्धत मी सांगू इच्छिते. लोणी कढवताना आधी एका पातेल्यात पुरेसं पाणी घ्यायचे. त्यात कढवायचे लोणी घेऊन पातेलं मंद गॅसवर ठेवायचे. हळूहळू लोणी वितळेल. लोणी पूर्ण वितळले की साधारण पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. पातेलं थंड झालं की ते फ़्रीजमधे ठेवावं. दुसर्या दिवशी पातेलं बाहेर काढून बघितलत तर पातेल्यात तुपाचा थर दिसेल. उकडलेला ढोकळा तुकडे करण्यापूवी जसा कडेणे सोडवून घेतो तसं हलक्या हाताने सुरी फ़िरवून थराची कड सोडवून घ्यावी. हा वरचा थर अलगद उचलून लोणी ज्या भांड्यात कढवणार त्या भांड्यात काढून घ्यायचा आणि आता नेहेमीप्रमाणे तूप कढवायचे.. तूप कढलं की गरम असतानाच गाळून घ्या. त्याने तुपाला छान कणी पडते. तुमच्या लक्षात येईल की खूप कमी बेरी भांड्यात असेल.

ज्या पतेल्यात लोणी वितळवून घेतलं होते त्या पातेल्यात चोथा म्हणजेच ताकातले सायीचे तुकडे अणि पाणि शिल्लक दिसेल. ते पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती प्रमाणात जास्त बेरी नेहेमीच्या पद्धतीने तूप कढवल्यावर येते. आत तुम्हाला जर सायीची खोड असेल तर ते पाणी गाळून घ्या. नाहीतर ते पाणी तुम्ही भाजी-आमटीत किंवा घावन करायला तसच वापरू शकता. जर पाणी गाळून घेतलं असेल तर तो उरलेला चोथा तुम्ही थालिपिठासाथी भाजणी भिजवताना त्यात घाला.. पाणी थोडे कमी घाला. अशी केलेली थालिपिठं खूप खुसखुशीत होतात.

एकही गोष्ट वाया न जाता चांगलं तूप खायला मिळाल्याने समाधान भरपूर मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे भांडं धुवायला खरं तर खरडवायला श्रम कमीई पडतात. दिसायला वरवर हे सगळं करणं जरी खूप वेळकाढू वाटलं तरी तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्षात काम विभागलं गेलं असल्याने सोपच आहे..

लोणी वितळवताना पातेल्यात पाणी किती घ्यायचं हाच प्रश्न असेल तर वितळलेल्या लोण्याच्या थराखाली दीड इंच पाणी राहील अशा अंदाजाने पाणी घ्या. लक्षात ठेवा की ह्या पाण्यात सगळे सायीचे तुकडे जमणार आहेत. तेव्हा तो थर काढताना हे तुकडे जेवढे कमी घेतले जातील तेवढी बेरी कमी येईल. प्रयोग म्हणून थोडे लोणी असे कढवून बघा म्हणजे पुढच्या वेळेस सगळे नीट जमून जाईल.. ह्या प्रकारात लोणी पाच-सहा वेळा धुण्याचं कामही कमी होतं. असं तूप कढवलत तर तुमची प्रतिक्रियाही जरूर लिहा.


Dineshvs
Monday, April 14, 2008 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली छान प्रयोग आहे हा. मला नक्कीच करायला आवडला असता, पण आता घरचे लोणी कुठे गं ?

फ़क्त एक बारिक सूचना, गरम तूप गाळताना नायलॉनची गाळणी वापरू नका, ती वितळते. ( अनुभवाचे बोल )


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators