|
मनुस्विनी मी नक्कि करुन बघेन..धन्यवाद...
|
Karadkar
| |
| Friday, April 04, 2008 - 7:19 pm: |
| 
|
http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_19.html माझ्या आज्जीची आमटीची रेसिपी इथे अहे.
|
Wel123
| |
| Friday, April 04, 2008 - 9:17 pm: |
| 
|
MALA 16 LOKANSATHI MOONG BHAJE KARAYECHE AAHET,TYASATHI MOONG KITI GHYAWE LAGEL.PLEASE HELP
|
Leenas
| |
| Monday, April 07, 2008 - 5:54 am: |
| 
|
येथे मी काही दिवसान्पुर्वी सिज़नल पालेभाज्यान बद्दल वाचले होते, म्हण्जे चिवळ, घोळ इ. मला कोणी सान्गु शकेल का कि त्या कुठे आहेत?
|
Cutepraj
| |
| Tuesday, April 08, 2008 - 8:57 am: |
| 
|
तुरीच्या डाळीची आमटी तुरीची डाळ शिजवुन घ्यायची नेहमीप्रमाणे थोडस हिन्ग आणि हळद घालुन. मग तेल गरम करुन त्याच्यात मोहोरि, जिर, हिन्ग हलद, कढिपत्ता आणि लाल तिखट घालायच. मग त्याच्यात चिरलेला कान्दा घालायच. त्याच्यावर थोडस मीठ घालायच. परत थोडस लाल तिखट घालायच. मग कान्दा पारदर्शक होइपर्यन्त परतायचा. मग त्याच्यात घोटलेली तुरीची डाळ घालायचि. मग हव असल्यास थोड पाणी घालायच. मग त्याच्यात ग़ुळ, आमसुल, गोडा मसाला, धनं जिर्याची पावडर, बारिक चिरलेली कोथिम्बिर ओला नारळ घालायच. मग चान्गली उकळी काढायची. मग एकदा चव बघुन तिखट, मीठ मसाला अजुन घालायचा.
|
Leenas
| |
| Tuesday, April 08, 2008 - 9:36 am: |
| 
|
येथे मी काही दिवसान्पुर्वी सिज़नल पालेभाज्यान बद्दल वाचले होते, म्हण्जे चिवळ, घोळ इ. मला कोणी सान्गु शकेल का कि त्या कुठे आहेत?
|
Karadkar
| |
| Tuesday, April 08, 2008 - 8:35 pm: |
| 
|
लीना, खालि लिंकमधे सापडतेय का बघ. /hitguj/messages/103383/59993.html?1188330609
|
Shmt
| |
| Tuesday, April 08, 2008 - 8:43 pm: |
| 
|
साखरेच्या गाठी कशा करतात? घरी त्या करणे शक्य आहे का?
|
Leenas
| |
| Wednesday, April 09, 2008 - 7:05 am: |
| 
|
धन्यवाद कराडकर, पण मी ती लिन्क पुर्ण पाहिली. तिथे नाही दिसली मला कुठे.
|
Leenas
| |
| Wednesday, April 09, 2008 - 9:29 am: |
| 
|
दिनेश्: तुम्ही लिहिला होता तो लेख, क्रुपया लिन्क सान्गा ना. मी घरी चिवळ आणुन ठेवलेली आहे....
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 09, 2008 - 12:38 pm: |
| 
|
सॉरी लीना, मी पण शोधत होतो. चिवळीची भाजी खराब्रीत खाटेवर चोळुन त्यातली पाने काढून घेतात. ती स्वच्छ धुवुन घेतात. मग तेलाची लसूण आणि मिरची घालुन फ़ोडणी करतात. त्यावर हि भाजी परततात. अश्या भाज्याना खुप पाणी सुटते. मग त्यात मीठ घालून कोरडे बेसन घालतात. आणि परतून ते शिजु देतात. हवे तर यात दाण्याचे कुट घालता येईल. मला वाटते, बी ने सविस्तर लिहिले होते या भाजीवर. आणि तो जुना बीबी, गिरिराजने सुरु केला होता. इथले सगळे जुने लेखन आता सापडत नाहीये.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 09, 2008 - 12:42 pm: |
| 
|
Shmt साखरेचा घट्ट पाक करुन साच्यात ओतला कि ती वार्याने घट्ट होते. या पाकाचे तपमान खुप जास्त असते त्यामूळॅ प्लॅस्टिकचे साचे चालणार नाहीत. याच साच्यात दोरा ओवुन माळा करतात. पाकात रंग पण घालता येतो. पाकात लिंबु मात्र पिळायचा नाही. साधारण अश्याच पद्धतीने जुन्या प्रकारचे लॉलीपॉप पण करता येते. पण घरी करणे जरा जिकिरीचे होते, सगळा ओटा चिकट होतो, आणि त्या गोड वासाने खाण्याची इच्छाच होत नाही, हा माझा अनुभव.
|
चिवळीच्या भाजीबद्दल माहिती ईथे सापडेल.
|
Shmt
| |
| Wednesday, April 09, 2008 - 8:59 pm: |
| 
|
दीनेशदा: जरा गाठी बद्दल अजुन सविस्तर सांगु शकाल का? म्हणजे साखर आणि पाणिचे प्रमाण? पाक किति घट्ट असला पाहिजे? कसा ओळखायचा? ताटात करता येइल का? मला माझ्या बळासाठी(पहीला सण) करायच आहे. मला माळच बनवायची आहे. धन्यवाद
|
Dineshvs
| |
| Thursday, April 10, 2008 - 2:53 am: |
| 
|
एक वाटी साखर घेतली तर त्यात अर्धी वाटी पाणी घालुन पाक करत ठेवायचा. उकळी आली कि त्यात दोन चमचे दूध घालायचे. त्याने सर्व मळी वर येईल व पाक शूभ्र होईल. तो सतत ढवळत आणखी आटवायचा. एका वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचा एक थेंब टाकायचा. तो न विरघळता त्याची गोळी जमली पाहिजे. मग गॅस बंद करायचा. ताटाला तेलाचा हात पुसुन घ्यावा. ताटापेक्षा एखादी फ़ळी जास्त चांगली. त्यावर एक साधा दोरा ताणून ठेवायचा. दोरा मध्यभागी येईल असे धरुन त्यावर चमच्याने, थोड्या थोड्या अंतरावर पाक घालायचा. तो पसरून गोल होईल. तो ओला असतानाच एखादे नक्षीचे नाणे वगैरे त्यावर दाबायचे. पूर्ण सुकुन पांढरा झाला कि सुरीने पाटापासून एकेक गोल सोडवून घ्यायचा. पाक गोळीबंद जमला कि हे नकीच जमेल.
|
Shmt
| |
| Thursday, April 10, 2008 - 3:27 am: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा. तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितल. मी करुन बघेन आणि मग सांगेन.
|
Prajaktad
| |
| Thursday, April 10, 2008 - 3:40 am: |
| 
|
shmt एक आयडिया (आत्ताच सुचलिय) वर सांगितलाय तसा पाक करुन मफ़िन पन मधे दोरा ठेवुन केल तर...फ़ळिपेक्षा सोप पडेल नाही का?.. बघ करुन .. जमल तर लिही इथे..
|
Lajo
| |
| Friday, April 11, 2008 - 4:31 am: |
| 
|
इथे आईस्क्रिम कसाटा कसे करायचे लिहीले आहे का कुठे? मला आईस्क्रिम भागात दिसले नाही...
|
Dineshvs
| |
| Friday, April 11, 2008 - 10:46 am: |
| 
|
सोपे आहे कि कसाटा. तीन एकात एक बसणारे अर्धगोल बोल्स लागतील. सर्वात आधी सर्वात छोट्या बोलमधे आतून थोडे बटर लावून घ्यावे. त्यात आवडीच्या ड्रायफ़्रुट्सची भरड पूड हाताने दाबून बसवावी. मग त्यात तयार आईसकीम दाबुन बसवावे व घट्ट करुन घ्यावे. मग तो बोल रिकामा करुन घ्यावा. आता मधला बोल घ्यावा. त्यात परत तसेच करावे पण मधे मात्र मोकळी जागा ठेवुन त्यात तो रिकामा बोल बसवावा. ते आईसक्रिम घट्ट झाले कि पहिले आईसक्रिम त्यात अलगद बसवावे. व शेवटी मोठा बोल घ्यावा. व परत सगळी कृति करावी. मग एक गोल सपाट स्पंज केक घ्यावा. ( याची कृति आहे इथे ) आणि तो मोठ्या बोलवर बसवावा. शेवटी हे सगळे प्लेटमधे उपडे करावे, आणि स्लाईसेस करुन घ्यावे. तीव्र स्वादाचे व रंगाचे आईसक्रीम आत व फ़िक्या रंगाचे आणि मंद स्वादाचे आईसक्रिम बाहेर ठेवावे. यात हवी ती रंगसंगति साधता येते. बाकि आपल्या कल्पनाशक्तीचे काम.
|
Lajo
| |
| Friday, April 11, 2008 - 12:35 pm: |
| 
|
थॅंक्स दिनेशदा. या वीकेंडला प्रयोग करून बघेन..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|