Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 27, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » गुलाबजाम / काला जामुन » Archive through November 27, 2007 « Previous Next »

Shmt
Thursday, October 20, 2005 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee ikMvaa Ajauna kÜNaI saaMgaola kaÆ maaj,yaakDo pNa pure milkmade-mawa powder Asao ilaihlaoila paikT Aaho to maI indian store(Deep product) maQauna AaNalao Aaho. %yaacao var ilaihlyaa p`maaNao gaulaabajaama hÜtIla kaÆ
Thx in adv.

Nandita
Tuesday, October 25, 2005 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

malaa Kvyaacaoca gaulaabjaama banavaayacao Aahot %yaaca p`maaNa AaiNa ËUtI kÜNaI Vala ka ? AiNa hÜ gaulaabajaama caa Kvaa vaogaLa AsatÜ kaÆ

Dineshvs
Thursday, December 29, 2005 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पारंपारिक गुलाबजाम,

ईथे वर कुणी लिहिले नाहीत असे गृहित धरुन.

मुंबईत काहि ठिकाणी ( दादरला कबुतर खान्याजवळ ) खास गुलाबजामचा मावा मिळतो. तो गाईच्या दुधाचा व दाणेदार असतो. गुलाबजामसाठी शक्यतो तो घ्यावा.
हा मावा ताटात ठापुन जरा वार्‍यावर ठेवावा. दोन वाट्या असेल तर पाव वाटी अरारुट त्यावर चाळुन घ्यावे. मग ते कोरडेच हाताने एकत्र मळावे. मग दुध लावुन चपातीच्या पीठाप्रमाणे खुप मळुन मुलायम करावे. मळताना त्यात चिमुटभर सोडा घालावा.
मग हाताला तुप लावुन त्याचे गोळे करावे. आतमधे हवा तर वेलचीचा दाणा किंवा दुधात भिजवलेला पिस्ता ठेवावा. असे सगळे गोळे करुन ओल्या करुन घट्ट पिळलेल्या कपड्याने झाकुन ठेवावेत.

दोन कप साखरेचा एकतारी पाक करुन तो गरम ठेवावा.

कढईत तुप तापवावे, ते तापले कि आच मंद करुन त्यात माव्याचे गोळे सोडावेत. ते गोल गोल फ़िरवुन तळावेत. तळताना फ़ुलायला हवेत.
मग पाकात सोडावेत. पाकात रोझ ईसेन्स किंवा केशर घालावे.


Charu_ag
Friday, December 30, 2005 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश.
वर कुणी दिल्या नसतील तर काही खास टिप्स देते.

गिट्स च्या पाकिटाचे गुलाबजाम करताना ते पिठ दुध शिंपडत बोटानी मळायचे. कणकेसारखे तळहाताने जोर देऊन मळले कि गुलाबजाम आतुन घट्ट होतात,कच्चे राहतात, आणि पाक पण आतपर्यंत मुरत नाही.

जर पारंपारीक पद्धतेने माव्याचे गुलाबजाम करण्यासाठी दिनेशनी सान्गितलेला मावा मिळाला तर उत्तम पण बरेचदा माव्यात खुप मैदा मिसळलेला असतो. अश्यावेळी गुलाबाजमाचे पीठ जरा अंदाज घेवुन मळावे. एक वाटी मैदा असेल तर दोन ते तीन चमचे मैदा मिसळावा. फार जोर लावुन मळायचे नाही. त्याचा गोळा करुन पहावा. गोळ्याला चिर पडली नाही तर मैद्याचे प्रमाण योग्य आहे. जर चिरा पडत असतील तर थोडे दुध शिंपडावे आणि खवा मिसळावा आणि पुन्हा हलके हलके मळावे. गोळ्याला चिर पडत असेल तर तळताना फुटतो. चिर असलेले गोळे खुप तेल्/तुप पितात.

तळलेला गोळा पाकात सोडल्यावर जवळजवळ तिप्पट्ट फुगतो, तेंव्हा त्या आकाराचा अंदाज घेवुन गोळे करावेत.

पाक जर जास्त घट्ट झाला तर गुलाबजम फुगत नाही, अश्यावेळी त्यात अर्धा कप कोमट पाणी घालावे.

CBDG
बिघडलेल्या गुलाबजामामुळे आलेले अनुभव. त्यातुनही गुलाबजाम बिघडलेच तर सांगा, त्याच्या पुढच्या प्रक्रिया देखील तयार आहेत.



Nandita
Friday, December 30, 2005 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

idnaoXaÊ caa$ thank you very much!!!
Aata gaulaabajaama kolyaanaMtr punha ilaihna wish me best luck

Bee
Friday, December 30, 2005 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुम्ही उशिरा आलात ह्या बीबीवर. मागे केवढा तरी तुमच्या नावाचा जप चालला होता. आता आलाच अहात तर सांगा, खवा आणि मावा ह्यामधे फ़रक काय आहे?

चारू, इतके दिवस कुठे होतीस? बरे नव्हते की भारतभेटीला गेली होतीस? we missed ur post :-)

हो.. गुलाबजाम बिघडले की नंतर छान अनुभव येतात. तसे सगळेच पदार्थ एकदा दोनदा बिघल्यानंतरच छान अनुभव येतात :-)

गुलाबजामचे एक तंत्र आहे, मैदा कमीत कमी वापरायचा आणि त्याच्या कितीतरी पटीने खवा. मग गुलाबजाम अस्सल स्वादिष्ट होतात.

गुलाबजल असेल तर त्याचे दोन तीन थेंब पाक करून झाल्यानंतर टाकले की गुलाबजामला सुंदरचा सुगंध येतो. त्याची चवही छान लागले. नसेल तर वेलची, केशरही चालते.



Dineshvs
Friday, December 30, 2005 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खवा हा मराठी शब्द आणि मावा हा गुजराथी शब्द आहे. हाच फ़रक आहे.

Saj
Thursday, February 16, 2006 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi ithe baryach janan kadun aikale aahe ki te pancake mix pasun gulabjam kartat. konala recipe mahit asel tar sahitya aani pramanasah koni kruti sangel ka please

Prajaktad
Monday, November 06, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्य!मी तुझ्या पद्धतिने रिकोटाचे गुलाबजामुन करुन बघितले नाही जमले..
मी तु सांगितल तस रिकोटाचा खवाटाईप करुन घेतले..मग मैदा मिसळुन घेतला पण,अजिबात फ़ुलले नाही...गरम पाकात टाकल्यावर चक्क श्रिंक होत होते..


Malavika
Monday, November 06, 2006 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पनकेक मिक्सचे गुलाबजाम करण्याची कृती:

साहीत्य:
३ वाट्या मिल्क पावडर
१ वाटी पनकेक मिक्स
पातळ तूप
दूध किंवा क्रीम

मिल्क पावडर व पनकेक मिक्स मिसळुन घ्यावी. त्यात मूठ वळेल इतके तूप घालावे. थोडे थोडे दूध किंवा क्रीम घालून साधारण कणके प्रमाणे भिजवावे. त्याचे गुलाबजाम वळून मंद आचेवर तळावेत. गरम एकतारी पाकात सोडावेत.


Malavika
Monday, November 06, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकात केशर आणी वेलची घालावी.

Prady
Thursday, November 16, 2006 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविका तूप गरम करून घालायचं का.

Malavika
Friday, November 17, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, तूप गरम करून घालायचे.

Deemdu
Monday, December 11, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या गावाकडे भट्टीत भाजलेला गरम गरम खवा मिळतो. भाऊ घेउन आला मागच्या आठवड्यात, म्हणुन मग शनिवारी गुलाबजाम केले त्याचे. अतिशय सुंदर झाले आणि लगेच संपलेही, वाटलं अजुन थोडा खवा असता तरी चाललं असतं ;)

मी दिनेशदांच्या कृतित थोडा बदल केला. खवा प्रथम नुसताच छान खरपुस वास येईपर्यंत परतुन घेतला. त्यामुळे त्याला खुप तुप सुटल होत.
थोडा थंड झाल्यावर त्यात मैदा मिसळुन mixer मधुन दोन वेळा फिरवुन घेतला. मग दुध न लावताच त्याचे गोळे केले. गोळे करताना थोडी विरी जात होती पण तसेच तळुन बघितले तर तुपात विरघळले वगैरे नाहीत ( हुश्श ) . तळतानाच कच्चा पाक करायला ठेवला, आणि गोळे तळुन झाल्या झाल्या थोडे तुप निपटुन गरम पाकात टाकले. संध्याकाळ पर्यंत मस्त मुरले होते.
एका दिवसात गट्टम :-(



Dineshvs
Monday, December 11, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deemdu कुठले गाव ? कोरड्या हवेत असा खवा तयार होतो. तो खुपच चवदार असतो.

Deemdu
Tuesday, December 12, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

correct दिनेशदा
उस्मानाबादेतल, भुम तालुक्यातल सरमकुंडी :-)

कोरडी हवा :-)


Wel123
Sunday, November 04, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ricotta cheese la thodi ambus chav yete,tar tyache gulabjamun chan kashe hotat,mhaza anubhav aahe.please help

Wel123
Monday, November 26, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

koni kala jamun chi recipe deil ka.

Suparna
Tuesday, November 27, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wel123, here's a good one.

Kala Jamun :
2 cups khoya (or fine ricotta)
4 cups sugar
2 cups paneer
1 tsp baking powder
5 tbsps. pistachios broken coarsely
½ cup rava
1 tsp. cardamom powder
ghee as needed

Mix khoya paneer, rava and baking powder. Knead well. Reserve for 2 hours. Mix sugar with three cups of water and boil. Remove scum as it tops. Add cardamom powder. When syrup is of a one - thread consistency remove. Divide khoya dough into lemon - sized balls. Stuff each centre with pistachios. Heat 2 cups ghee and fry gently till the jamuns are dark brown. Drain and put in syrup one by one. Add remaining pistachios, and serve.




Wel123
Tuesday, November 27, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks superna ricotta waparun chan hotat ka jamun....kuthala ricotta use karu.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators