|
Dineshvs
| |
| Wednesday, November 19, 2003 - 6:50 am: |
| 
|
फ़्लॉवर बहार अर्धा किलो फ़्लॉवरचे तुरे मीठ घातलेल्या पाण्यात उकडुन घ्यावेत. थोड्या लोण्यावर मैदा किंवा कणीक परतुन घ्यावी. त्यात दुध आणि फ़्लॉवर उकडलेले पाणी घालावे. त्यात थोडे जायफळ व मिरी पाव्डर घालावी व फ़्लॉवरचे तुरे घालावे. मीठ घालावे.शिजुन घट्टसर झाले की एका प्लेटमधे काधुन घ्यावे. वरुन थोडे चीज किसुन घालावे, व १० मिनीटे बेक करावे. फ़्लॉवरबरोबर गाजरे, हिरवे वाटाणे फ़रसबी वैगेरे वापरता येईल. या भाज्या नुसत्या लोण्यावर परतुन सजावट करता येईल. ब्रोकोलिचे तुरे पण छान दिसतात. बरोबर गार्लिक टोस्ट घ्याव्या.
|
Tanya
| |
| Monday, August 08, 2005 - 1:21 pm: |
| 
|
ही फ़्लोवर,सिमला मिर्चि आणि मटरचि सुकी भाजी आहे. pan मधे तेलावर कान्दा(३ते४) चिरुन टाका.कान्दा परतल्यावर गरम मासाला,तिखट घालुन परतवुन मटार(१ cup ),चिरलेला फ़्लोवेर (१ cup ), मिठ,घालुन वाफ़ेवर भाजी शिजवा. नन्तर त्यात टोमटो(२), सिमला मिर्चि(१) बारिक फोडि करुन add करा.२ते३ minute परतुन भाजी सुकी करा. वरुन chat मसाला, कोथिम्बिर पेरा.
|
Sunidhee
| |
| Thursday, February 22, 2007 - 5:09 pm: |
| 
|
एक छान भाजी. जरा खटाटोप आहे. पाउण किलो फ़्लावर, थोडा लिंबाचा रस, १ छोटा चमचा हळद, मीठ, तळायला तेल, २ मोठे चमचे आले-लसुण पेस्ट, १ छोटा च. लाल तिखट, अर्धा च. जिरेपुड, थोडे डाळीचे पीठ. ग्रेव्हीसाठी - अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, १ छोटा च. आले-लसुण पेस्ट, १ मोठा च. वाटलेल्या बदामाची पेस्ट, पाव वाटी टोमॅटो प्युरी, १ वाटी दही, पाउण वाटी खवा (मिळत नसेल तर मी घालत नाही), १ छोटा च. धणेपुड, २ छोटे च. बडिशेपेची पुड, १ छोटा च. लाल तिखट, अर्धा लहान च. हळद, अर्धा लहान च. गरम मसाला, मीठ, पाव लहान च. केशर (पाव वाटी दुधात भिजवुन ठेवावे), अर्धी वाटी तुप. कृती - फ़्लावर चे तुरे तोडुन घ्यावे व निट धुवून घ्यावेत. थोड्या पाण्यात हळद, मीठ, लिंबाचा रस घालुन त्यात तुरे घालुन ५ मि. उकळावे व लगेच निथळुन घ्यावे. त्याना आले-लसुण पेस्ट, तिखट, जिरेपुड, थोडे मीठ लावून डाळिच्या पिठात घोळवावे व तळुन घ्यावे. दुसया एका पसरट भांड्यात तूप तापवून कांदा गुलाबी परतावा. त्यावर आले-लसुण पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला, धणेपुड, बडीशेपेची पुड घालुन बदामाची पेस्ट परतावी. त्यावर दही, टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ घालुन मांद गसवर उकळावे. खवा व केशरी दूध एकत्र करुन ते घालावे. दाटसर ग्रेव्ही तयार करुन त्यात तळलेले फ़्लावर चे तुरे सोडावे. घट्ट झाकण ठेउन एक वाफ आणावी.
|
Dineshvs
| |
| Thursday, February 22, 2007 - 5:19 pm: |
| 
|
सुनीधी एक बारिक सुचना. फ़्लॉवरचे तुरे उकडायची गरज नाही. ते कच्चेच मुरवायचे. डाळीचे पिठ कमी घेऊन अर्धवट तळायचे. जरा थंड झाले कि हाताच्या तळव्यात जरा दाबुन घेऊन परत तळायचे. असे केले कि मसाला छान जिरतो आत. आणि तुकडेहि खमंग तळले जातात. मग ग्रेव्हीत टाकुन उकळायचे नाहीत. आयत्यावेळी मिसळायचे ग्रेव्हीत.
|
Cutepraju
| |
| Tuesday, November 13, 2007 - 5:41 am: |
| 
|
अजुन एक पद्धत फ़्लाॅवरच्या भाजीची फ्लाॅवरचे छोटे छोटे तुरे करुन घ्यावेत. त्याचप्रमने २-३ मध्यम आकाराचे कान्दे घेवुन ते पण बारीक चिरावे. तसेच २ बटाटे काचर्या करायला चिरतो तसे पण छोटे तुकडे करावेत. आलं आणि हिरवी मिरची पण बारीक चिरुन घ्यायच. नन्तर एका कढईमधे तेलाची मोहोरी हिन्ग घालुन फोडणी करावी. त्याच्यात प्रथम कान्दा परतावा. मग तो थोडा पारदर्शक झाला कि फ़्लाॅवरचे तुरे आणि बटाटा घालावा. मग अजिबात पाणी न घालता झाकण ठेवुन शिजवाव. फ्लाॅवर एकदम न शिजता थोडा करकरीत राहिल ईतपत भाजी शिजवावी. मग त्याच्यात चवीनुसार मीठ आणी बारीक चिरलेल आलं आणि मिरची घालुन व्यवस्थित परताव. वरुन थोडी बारीक चिरलेली कोथिम्बीर घालावी. फ्लाॅवरचे एकदम छोटे तुकडे करावेत म्हणजे ते व्यवस्थित शिजत. मस्त लागते अशी भाजी खायला...
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 13, 2007 - 3:53 pm: |
| 
|
Cutepraju मस्कतच्या पंजाबी घसिटाराम मधे मी खुपदा अशी भाजी खाल्ली आहे. मग घरी पण करु लागलो. लोखंडाच्या कढईत केली तर खुप छान लागते. फ़्लॉवरचे मोठे तुकडेही शिजतात व्यवस्थित. जरा वेळ लागतो इतकेच.
|
Nayana
| |
| Wednesday, December 26, 2007 - 5:17 pm: |
| 
|
मला नेहमीच फ़्लावरला वास येतो तो जाण्यासठी काय करावे? मी तो उकडुन घेते..तरिही वास जात नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, December 27, 2007 - 2:56 am: |
| 
|
फ़्लॉवर बंद भांड्यात उकडला तर जास्तच वास येतो. वरच्या भाजीतले किंवा बाकिचे मसाले भाजीत वापरले तर वास जातो. खास करुन दालचिनी आणि मिरी वापरली तर वास जातो. शिजल्यावरहि भाजी थोडावेळ झाकण न ठेवता, राहु द्यावी.
|
Anjut
| |
| Thursday, December 27, 2007 - 11:11 am: |
| 
|
नयना फ़्लॉवर उकडून घेताना त्याच्यात लिम्बाची साल घातली तर वास जातो तसेच फ़्लॉवर पांढरा पण राहातो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|