Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चायनीज सि फुड सुप ...

Hitguj » Cuisine and Recipies » Soups and Salads » सूप » चायनीज सि फुड सुप « Previous Next »

Raja_of_net
Monday, September 18, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्लिच केलेला पण छान झालेला प्रकार.
साहित्य: चिकन स्टॉक ( Maggi च्या क्युब्स मिळतात. अर्धा लिटर पाण्यासाठी १ क्युब हे प्रमाण), अर्धा लिटर पाणि (२ जणांसाठि पुरे), २ चमचे तेल, ४-५ लसूण पाकळ्या बारिक तुकडे केलेल्या, १ छोटा चमचा आलं ठेचुन घ्याव, ४-५ कोलंबि, कुठल्याही माशाचे पातळ तुकडे (पापलेट असेल तर उत्तम), पातिचा कांदा बारिक चिरलेला, baby corns and baby carrots, button mashrooms (प्रत्येकी २. मध्यम आकाराचे तुकडे करून), १ अंडे, १ टॉमटो (४ तुकडे करुन) , १ चमचा लिंबाचा रस.

(ह्याव्यतिरिक्त कोबीची पाने, पालकचि पाने, चिकन बॉल्स,मिट बॉल्स, तोफु इत्यादि पदार्थ असले तर उत्तम.)

कृती: एका भांड्यात तेल गरम करुन आलं-लसूण dark होईतो परतुन घेणे, त्यात कोलंबि, माशाचे तुकडे, baby corns and baby carrots, button mashrooms २ मिनिटे सॉते करावेत, नंतर त्यात पाणि, चिकन स्टॉक आणि टॉमटो टाकुन उकळि आणणे. उकळि आल्यावर लिंबाचा रस टाकुन सर्व्हिंग बाउल मधे सुप ओतावे. अंडे फोडुन त्यात टाकुन वरुन पातिचा कांदा पसरणे.

हे सुप साध्या भाताबरोबर वा नुडल्स बरोबर गरमा गरम सर्व्ह करावे आणि सोबत, असेल तर, light soy sauce मधे १ बारिक चिरलेली लाल मिरचि टाकुन देणे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators