|
$$$$$$$$$$ आब्यांचा रस घालुन शिरा(रव्याचा)करताना आमरस नेमका कधि आणी किती घालायचा. $$$$$ plz माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या
|
प्राजक्ता, मी आंब्याचा शिरा करताना २ वाट्या रवा असेल तर साधारण दीड दोन वाटी आमरस घालते.जास्त पण चालतो, चव,स्वाद हवा तसा झाला म्हणजे झाले. मी रवा भाजून झाल्यावर जेव्हा पाणी / दूध घालतो त्यावेळेस घालते आमरस.. मी टीनमधल किन्वा फ़्रेश रस direct च वापरते, हापूस चा रस दाट च असतो त्यामुळे पाणचट नाही होत. पाणी अथवा दुधाचे प्रमाण मात्र रसामुळे जरा बदलते.(जरा कमी लागते) स्वाद आणि दिसायला पण फ़ार सुन्दर होतो हा शिरा.
|
मैत्रियी धन्यवाद! मूडी , मैत्रियी हा शिरा छानच लागतो. माझी मावशी खुप छान करते... मैत्रियी मला अजुन एक प्रश्न आहे नेहमिच्या शिर्याला कस आपण उकळिचे दुध टाकतो, त्याने रवा मस्त फ़ुलुन येतो. मग दुधाएवजी जर रस टाकला तर रवा फ़ुलुन येणार नाही.
|
Dineshvs
| |
| Sunday, June 04, 2006 - 5:29 pm: |
| 
|
तयार आमरसात भरपुर साखर असते त्यामुळे तो एक वाटी रव्याला एक ते दीड वाटी घालायचा आणि तो रवा शिजल्यानंतर. ( म्हणजे साध्या शिर्याला आपण साखर घालतो त्यावेळी ) रसातल्या साखरेमुळे रवा नीट शिजणार नाही. ताजा रस वापरायचा असेल तर, आंब्याच्या गोडीप्रमाणे प्रमाण कमीजास्त होईल. झक्की, लहान मुलाचे पाणी ऊकळताना त्यात सोने टाकुन ऊकळले तर स्मरणशक्ती उत्तम रहाते, असे म्हणतात. नाहीतर बाळाला गळ्यातले लॉकेट चोखायला शिकवावे.
|
Miseeka
| |
| Thursday, July 13, 2006 - 9:02 pm: |
| 
|
Mi Amras cha Shira kartana jevha aapan sugar add karato tyaveli Amras ghalte .sugar jara kamich ghalte nahi tar jast god hoil mhnun.
|
Maku
| |
| Monday, February 26, 2007 - 5:33 am: |
| 
|
Dineshvs please तुम्हाला माहीत असेल तर मला रेसेपी देता का. मी कधिच असा शिरा खाल्ला नाहीये.
|
Dineshvs
| |
| Monday, February 26, 2007 - 8:14 am: |
| 
|
एक वाटी रवा, तुपावर बदामी परतुन घ्यावा. रव्याच्या जाड बारिकपणावर अवलंबुन पाऊण ते सव्वा वाटी पाणी घालावे व रवा शिजु द्यावा. शिजल्यावर मोकळा होत आला कि एक वाटी आमरस व चवीप्रमाणे साखर घालावी. मिश्रण परत पातळ होईल, मग ते मंद आचेवर परतुन घ्यावे. रत्नागिरीला आंब्याचा मावा मिळतो, तो घालुनहि असा शिरा करता यील. त्यावेळी अजिबातच साखर घालायची नाही. पण थोडेसे पाणी शिंपावे. शिजल्यावरहि ज्या फळाचा स्वाद टिकुन राहतो, अश्या फळांचा म्हणजे केळी, अननस ( टिनमधला ) गर आपरता येईल. अश्यावेळी शक्यतो वेगळा स्वाद म्हणजे वेलची वैगरे फार घालु नये. उरलेले जाम, मार्मलेड घालुनहि असा प्रकार करता येईल. ( हि आयडिया आताच सुचली. ) साखरेच्या जागी काकवी वा मध वापरता येईल.
|
Maku
| |
| Tuesday, February 27, 2007 - 11:32 am: |
| 
|
thanks दिनेश मी नक्की करुन बघेल हा शिरा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|