Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 07, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » थालीपीठ » Archive through September 07, 2006 « Previous Next »

Dineshvs
Thursday, December 08, 2005 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुरडा, हुरडा नुसते नाव ऐकलेय. खाल्ला तो मुंबईत मिळणारा राजस्थानी हुरडा.
नलिनी, तुझे नाव सांगुन तुझ्या घरी गेले पाहिजे आता.


Suniti_in
Thursday, December 08, 2005 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेथी पालक थालिपीठ.

वरती दिल्याप्रमाणे भाजणी असेल तर उत्तम पण नसेल तर गहू, बाजरी, ज्वारी, बेसन,थोड तांदळाच पीठ घ्याव. जळगाव साईडला कळ्ण्याच पीठ्(ज्वारी-काळे उडीद ३-१ प्रमाणात दळलेले) मिळते. त्याने छान चव येते.
सर्व पीठे एकत्र करून त्यात १/२ लिंबाचा रस, तिखट, मीठ, हळद, जीरा पावडर, धना पावडर, ओवा, लसनाची पेस्ट, १ टोमॅटोची प्युरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, मेथी बारीक पाने निवडलेली असेल तर तशीच किंवा चिरून चिरल्याने थोडा कडवट पणा येतो), पालक बारीक चीरलेला किंवा प्युरी.
हे सर्व मिश्रण एकत्र करून १ टे. स्पून चमच्याची कडकडीत फोडणी द्यावी. पीठ मळताना पाण्याची गरज भासली तरच वरून पाणी टाकावे.
नलिनीने सांगितल्या प्रमाणे थापून करायाचे असल्यास पीठ थोडे सैल भीजावे. पाण्याचा हात लावून थापावे. नाहीतर तर तांदूळ किंवा गव्हाच्या पीठावर लाटावे. ३-४ भोके पाडून तव्यावर बाजूने तेल सोडून खमग भाजावे. खायला देताना वरून साजूक तूप किंवा लोणी किंवा बटर पसरवून दह्यासोबत आणि लसणाची ओली चटणी, मिरचीचा ठेचा यासोबत द्यावे.

लसणाची चटणी
एका लसणाच्या पाकळ्या(लाल लसून असेल तर छानच) , लाल तिखट चवीप्रमणे, मीठ, थोडी कोथिंबीर एकत्र करून २ चमचे पाणी टाकून बारीक वाटणे. (तिखट वाटल्यास थोडा शेंगदाण्याचा कूट घालावा.)

मिरचीचा ठेचा-
कमी बिया असलेल्या लांबसर मीरच्या या शक्यतो पोपटी रगाच्या कमी तिखट असतात.) थोड तेल टाकून परतून घ्यावा. (ठसका सूटेल). त्यात लसणाच्या ७-८ पाकळ्या, मीठ, कोथिंबीर एकत्र करून बत्यामध्ये जाडसर वाटणे. मिरच्या तिखट असतील तर भाजलेले दाणे जाडसर वाटून ठेच्यासोबत थोडा लिंबू पिळून तेलात परतावे.

कोबीचे/ मुळ्याचे थालिपीठ

हेच थालिपीठ मेथी, पालक नसेल तर किसलेला किंवा बारीक चीरलेला कोबी/मुळा वापरूनही छान लागातात. फक्त कापल्यावर किंवा किसल्यावर कोबी/मुळा भरपूर पाण्याने धुवावा. वास निघून जातो.



Moodi
Thursday, December 08, 2005 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला रे सगळ्यानी आता नलिनीच्या घरी जाऊन त्यांचाकडच्या शेतावर धाड घालुया.
नलिनी माझ्या मैत्रीणीच्या आईने एकदा दशम्या म्हणुन प्रकार केला होता, अतिशय तिखट पण त्यात त्यानी बाळंतशोपा घातल्या होत्या ना त्यामुळे अजीबात बाधाल्या नाहीत. अग सगळ्यांचे डबे संपले पण तिच्या दशम्या तश्याच उरल्या, अन ती मला म्हणाली नेतेस का, मी आणल्या अन अधाश्यासारख्या संपवल्या, बरोबर तशीच घरची लसणाची तिखट चटणी पण हादडली होती.


Moodi
Thursday, December 08, 2005 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा सुनिती मस्त माहिती दिलीस ग. धन्यवाद मनापासुन. चटण्या तर एकदम खास.

Chandrika
Tuesday, February 21, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Me recently 'steamed thalipith' ha prakar aikala mazya eka friendkadun. Thodese pusat tel lavun dhokalyachya plate var thalipith thapun 5-6 minute steam karave asa mhaNali.

Neelu_n
Thursday, October 20, 2005 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


kakDIcao DÜsao

saaih%ya Á
maÜzI kakDI ³tvasao´Ê AalaolasauNa vaaTNaÊ taMdLacao ipzÊ ijaropuDÊ QaNaopuDÊ cavaIpurto maIz

ËutI Á
p`qama kakDI kapuna iksauna GyaavaI. ³baIyaa Xa@yatÜ yaoNaar naaiht ho phavao´naMtr %yaat AalaolasaNaIcao vaaTNaÊ jaIroQaNao puDÊ cavaIpurto maIz Gaalaavao %yaanaMtr %yaat taMdLacao ipz Gaalaavao. kakDIlaa paNaI sauTt Asalyaanao %yaatca maavaola [tko pIz Gaalaavao. sava- vyavasqaIt ek~ kravao.
imaYrNa qaalaIpIzacyaa pIzaetko Ga+ Asaavao. tvyaavar qaÜDo tola Gaalauna tvyaavar sav~- psaravao. kakDIcyaa ipzacaa CÜTa gaÜLa Gaovauna tvyaavar qaapavao. psarNyaasaazI maQao maQao paNyaacaa hat laavaavaa. dÜnhI baajaunao laalasar Baajaavao.
ha DÜsaa caTnaIbarÜbar Kayayalaa Vavaa.


Mrinmayee
Tuesday, September 05, 2006 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांद्याचं थालीपीठ:
४ मोठे कांदे किसून
२ वाट्या चिरलेली कोथिंबीर
२ चमचे तीळ
४ हिरव्या मिरच्या बारिक चिरून
मीठ
पाव चमचा हळद
१ चमचा तीखट
एक वाटी कणिक
एक वाटी डाळीचं पीठ (बेसन)
१ चमचा धणे पावडर
२ मोठे चमचे कढत तेल
कृती:
कीसलेल्या कांद्याला हळद, तिखट, मीठ लावून ठेवावं.
तासाभरानी, सुटलेल्या पाण्यात कोथंबीर, हिरवी मिरची, धणेपूड आणि तीळ घालून कालवून घ्यावं
दोन्ही पीठं जरा भाजून घेऊन कांद्यात मिसळावी.
वर कढत तेल ओतून परत कालवावं.
हे कालवलेलं मिश्रण थालीपीठ लावण्याइतपत पातळ नसेल तर जरा पाणी घालावं.
तव्यावर पातळ थालीपीठ लावून त्याला चमच्यानी ४-५ छिद्र करावी.
तेल सोडून खरपूस भाजावं.
(या थालीपीठाला तिखट मीठ जरा जास्त लागतं. नाहीतर कांद्यामुळे जरा गोडीळ चव येते)


Prady
Tuesday, September 05, 2006 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ नुसतं वाचूनच तोंडाला पाणी सुटलं. करून पाहिलं पाहिजे. कांदा बारीक चिरून केलं तर चालेल का. की किसलेल्या कांद्याला जास्त पाणी सुटतं म्हणून तसं करायचं.

Mrinmayee
Tuesday, September 05, 2006 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, अगदी बरोबर. कीसलेल्या कांद्याला पाणी जास्त सुटतच. बारिक चिरलेल्या कांद्याचं पण थालीपीठ होतं. पण का कुणास ठाउक चवीत फरक लागतो. आणि किसलेल्याचं चवदार लागतं.
आवळ्याच्या लोणच्याशी हे थालिपीठ म्हणजे ... फारच मस्त लागतं :-)


Prady
Wednesday, September 06, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय गं अशी छान छान नावं घेत असतेस. चल आता आवळ्याच्या लोणच्याची पण दे रेसेपी.

Bee
Wednesday, September 06, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, मलाही ही किसलेल्या कांद्याच्या थालीपीठाची कृती खूप आवडली. मला एक सांग, कांदा किती बारीक किसायचा.. अगदी लगदा झाला तरी चालतो का? कारण माझा असा अनुभव आहे की कांदा किसला की तो गोळाच होतो.

तू कोथिन्बीर निवडते तेंव्हा नुसती चिरते की आधी एक एक पान निवडते आणि मग चिरते. नुसती चिरून काढली तर देठपण सोबत येतात आणि त्याची चव नीट लागत नाही.


Mrinmayee
Wednesday, September 06, 2006 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, कांदा कसाही किसला तरी चालतो. लगदा झाल्यावरही त्यात इतर मसाला कालवता येतो.
कोथिंबीर निवडण्याची प्रत्येकाची आपापली पध्दत! मी एक एक पान खुडत नाही. देठही घेते. अगदी बारिक चिरलेल्या देढातही छान स्वाद असतो.
प्रज्ञा, आवळ्याच्या लोणच्याची माझी कृती: स्वयंपाक घरात जाणे. आईने केलेल्या लोणच्याची बाटली उघडणे. "अगं चमचा पुसून घे कोरडा" हा आईचा धसाडा खाणे! :-) पण टाकते आईला विचारून रेसिपी.
इतर कुणाला माहीती आहे का कसं करतात हे लोणचं?


Bee
Thursday, September 07, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, मी काल तू दिलेल्या कृतीप्रमाणेच अगदी थालीपीठं करुन बघितलेत. पहिल्यांदच मी केलेल्या थालीपीठांपैकी मला ही कृती पसंत पडली. मी पीठं भाजून घायचो विसरलो. मला काही गोष्टी लक्षात आल्या त्या अशा की

१) जर कांदे मोठे न घेता आकाराने लहान निवडलेत तर ते किसायला सोपे पडतात कारण कांदे जर मोठे असले तर त्यातील layers बाहेर पडतात आणि मग ते किसल्या जाऊ शकत नाही. म्हणून मी चार ऐवजी आठ छोटे कांदे घेतलेत.

२)कांदे किसता किसता डोळ्याला जळजळीत धारा लागल्या होत्या. ह्यावर खरच काहीतरी उपाय हवाच नाहीतर डोळे लालभडक होतात, नाकातून पाणी टपकते आणि वैताग येतो किसताना. मी तरी कांदे धुवुन घेतले होते साल काढल्या नंतर.

३) आज सकाळी मी वमन केले. मी कधीही जेंव्हा नविन मेनू करुन खातो तेंव्हा दुसर्‍या दिवशी आधी उठून वमन करतो. म्हणजे सहा ग्लास पाणी प्यायचे आणि ते परत बाहेर टाकायचे. तर मला आढळले किसलेले कांधे पचले नाही. खूपसे कांदे बाहेर पडलेत. ह्याचा अर्थ कांदे नीट झाले नाहीत. कारण नीट शिजलेली गोष्ट नक्कीच पोटाला हलकी पडते म्हणून पचते. कांदे कच्चे राहिले होते म्हणून ते पचले नाहीत. जर मी ठालीपिठ अधिक वेळ ठेवले असते तर ते करपले असते, जळले असते.

४) मला वरतून पाणी ओतायची गरज पडली नाही इतके पाणी सुटले होते कांद्याला. माझे पीठ खूप चिकट झाले होते. इतके की मला त्याचा गोल गोळा देखील करता येत नव्हता. मी मग तेलाच हात लावून लावून गोळा केला. पाणी लावले असते हाताला तर अधिक पातळ झाले असते. मृ, नक्की consistency किती हवी? पोळी लाटता आली पाहिजे इतकी का? पण मी थालीपीठ थेट तव्यावर थापून केले. त्यामुळे मला वाटते पीठ थोडे पातळच असायला हवे. पण ते खूप चिकट झाले होते ते तसेच व्हायला हवे का? की बेसनामुळे ते तसे झाले? मला वाटते बेसन थोडे कमी घ्यायला पाहिजे.

५) मी वर जसे म्हंटले की पीठ थोडे पातळ झाले होते. त्यामुळे काय होते की, थालीपीठ लवकर भाजली जातात आणि आतला भाग कच्चा राहतो, अर्थात कांदापण कच्चा राहतो. मग तो असा वमन करुन बाहेर काढावा लागतो. जे प्रत्येकालाच जमत नाही. जर कांदा पचला नाहीतर गुंगी आल्यासारखे होते.

६) तू म्हणालीस की थालीपीठं गोड होतात. पण तसे नाही, उलट मला वरतून साखर घालावी लागली तेंव्हा चव आणखी छान आली. कांद्याची गोड चव तेंव्हाच येईल जेंव्हा कांदा छान खरपूस भाजल्या जाईल.

असो.. धन्यवाद! मला ही कृती आवडली. पुढल्यावेळी नक्कीच ह्यात improvement होईल. आज सकाळी मी उरलेले थालीपीठ खावून पाहिजे तर चव आणखी मुरली होती.


Moodi
Thursday, September 07, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे नुसते थालीपीठ कसे झाले, त्यात तू आणखीन काय भर टाकलीस, त्याचे पीठ कसे मळले, ते कसे भाजले, कितपत आवडले एवढेच लिहीले असते तरी चालले असते रे. पंचकर्म विधी लिहायची काही आवश्यकता होती का?

आम्हाला अजून ते थालीपीठ करायचे आहे, त्या आधीच तू कांदे कुठल्या कुठल्या मार्गाने बाहेर पडले याचे वर्णन करायला लागल्यावर कसे रे व्हायचे? असे पंचकर्म विधी करणार्‍या समोर बसुन जेऊन बघ म्हणजे समजेल तुला काय होते ते.

अन्नपूर्णेचा बीबी आहे हा, आरोग्याचा नव्हे. विचार करुन लिहीत जा.


Bee
Thursday, September 07, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, मी वर इतके मुद्दे लिहिले त्यातला तुला फ़क्त बोलायला मिळेल म्हणून तेवढा वमनाचा मुद्दा घेता आला का? मला मृ ला फ़क्त एकच विचारायचे होते त्यातून की इतके कांदे वापरल्यनंतर जर ते जड होतात. वर पीठ खूप चिकट झाल्यामुळे पालीपीठं खूप पातळ थापता येत नाही. बघ +vely घेउन पहा..

Moodi
Thursday, September 07, 2006 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वार्‍याशी वाद घालु नये म्हणतात ते खरे आहे. तुझ्याजवळ विचारशक्तीच नाही म्हटल्यावर काय करणार. लिही बाबा जे मनात येईल ते.

Bee
Thursday, September 07, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मूडी, तू फ़ार प्रेमळ आणि विचारवंत आहेस. मी नेहमी निमूटपणे न ऐकता वाद घालणारा आणि शून्य विचारशक्ती असलेला. तुझ्यामुळे नव्यानीच मला हा आत्मशोध लागला.

Moodi
Thursday, September 07, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला तुला निदान एक तरी शोध लागला ना, आनंद आहे.

Mrinmayee
Thursday, September 07, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, माझी एक कळकळीची विनंती आहे. तुझ्या वरच्या post मधे 'कांदे न पचण्याचा भाग कृपा करून काढून टाक! इतरांना तो भाग वाचून हे थालीपीठ खाण्याची इच्छा मेली असेल एव्हाना. तरीही तुझ्या प्रश्णांना उत्तर देईन.
शेवटी, कुठलीही रेसिपी ही गाईडलाईन म्हणून वापरायची अस्ते. बदल तर करता येतात.
सरळ तव्यावर थापता येण्याईतकं पीठ सैल हवं.
थालीपीठ लावताना बॅटर चीकट वाटलं तर डाळीचं पीठ कमी करता येतं. (मला तरी हा प्रॉब्लेम आला नाही). किंवा तेलाचा हात लावून मग थालीपीठ लावावं.
कांद्याच्या प्रकारावर बरंच अवलंबून असतं. म्हणूनच मी आवश्यकतेनुसार पाणी घालण्याबद्दल लिहिलंय. तसंच कांदा गोड असण्या-नसण्याबद्दल पण!
व्यवस्थीत शिजवायला, मंदा आचेवर आणि झाकण ठेवून थालीपीठ शीजवता येतं.
पुन्हा एकदा, तु माझी विनंती मान्य करशील अशी अशा आहे.


Moodi
Thursday, September 07, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी अगं पाण्याचे भांडे शेजारी ठेवायचे आणि प्रत्येक थालीपीठ करतांना हात ओला करुन थापायचे, तेलाची तशी गरज पडत नाही आणि चिकटत पण नाही. मात्र चुकुन जर जाड थापले गेले तर नीट भाजले जात नाही हा अनूभव आलाय. माझ्या सासुबाई अगदी छोटे म्हणजे पुरी एवढे 3-4 थालीपीठे एकाच वेळी तव्यावर करुन गरम गरम देतात. मी त्यावेळी वाटीभर लोणी घेते.( कॅलरीज कोण बघतय? माहेरी पण तेच करते.)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators