Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कांद्याची पात - Spring Onion...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » पालेभाज्या » कांद्याची पात - Spring Onion « Previous Next »

Anand2k
Monday, August 14, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi, can u please tell me the recipe of "Kandyachya patyanchi channa peeth perun bhaji"

Lalitas
Monday, August 14, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कांद्याच्या पातीचा पीठ पेरुन झुणका असा करते:

तीन पातीचे कांदे पात्यासकट बारीक चिरावे. एक मोठी जुडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
जास्त तेलाची मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी, फोडणींत शेवटी लाल मिरची पूड व कोथिंबीर जरा परतून घ्यावी. नंतर चिरलेली कांद्याची पात घालून मीठ घालावे व एक वाफ येऊ द्यावी. मग अर्धी वाटी बेसन घालून नीट परतावे. आच अगदी मंद करावी. भान्ड्यावर पाणी घालून झाकण ठेवावे. दर तीन - चार मिनिटांनी भाजी ढवळत रहावी. बेसन शिजले की भाजी झाली, कमीत कमी २० मिनिटे लागतातच. भाजी होते अप्रतिम, पण तेल जरा जास्ती लागतं कारण पाणी अजिबात टाकायचं नसतं.


Anand2k
Friday, August 18, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभारी आहे, मी कालच कांद्याच्या पात्याची भाजी केली आनी सर्वांना खुप आवडली.

आनंद


Chiku
Wednesday, September 06, 2006 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशीच भाजी मी साध्या कांद्याची पण करते.

कांदा मध्यम चिरुन, नेहमीची मोहरी, हिंग, हळद फ़ोडणी करावी. कांदा थोडा शिजला की लाल तिखट, मीठ, गुळ घालुन आणखी परतावा. त्यात थोडे थोडे डाळीचे पीठ घालुन परतावे. झाकण ठेवुन एक वाफ़ येऊ द्यावी.
आवडीनुसार ओलसर किंवा कोरडी भाजी ठेवावी. हि भाजी लोखंडी कढ ईत केल्यास छान खरपुस चव येते.


Psg
Wednesday, September 27, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मदत हवी आहे.. कांद्याच्या पातीची भाजी मी केली की ओलसर रहाते.. डाळीचे पीठ वगैरे सर्व शिजलेलेअ असत, पण भाजी कोरडी होत नाही.. ओली ओली रहाते.. भाजी पीठ पेरून कोरडी कशी करायची? माझी कृती वर ललिताताईनी लिहिल्याप्रमाणेच आहे- पाणी अजिबात नाही घालत

Dineshvs
Wednesday, September 27, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीठ पेरण्या आधी पात पुर्ण शिजायला हवी. त्यात थोडे पाणी असतानाच पिठ पेरायचे. आणि मग पिठ शिजले कि मंद आचेवर परतत रहायचे.
थोडे तेल घालावे लागेल. आणि परतत असताना डिखळे मोडत रहायची. जरा वेळ परतल्यावर कोरडे होते.
कदाचित पिठ कमी पडत असेल.
खुपदा एखादे बेसन चिकट असते, त्याने असा गोळा होतो. पेरण्यासाठी भरड दळलेले बेसन चांगले. हल्ली असे भरड बेसन बाजारात मिळते. भाजणी पेरली तर सगळ्यात छान.


Bee
Thursday, September 28, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही.. माझा अंदाज असा आहे की पिठ जर पाणी पित असेल तरच भाजी गोळा होते. त्यावर एकच उपाय मी काढला की तेलात पिठ खमंग भाजून मगच भाजीत घालायचे.

भाजीच्या पाण्याचा तसा प्रश्न येत नाही कारण पिठ जास्त जरी घातले तरी जेवढे पिठ भाजीच्या पाण्यात शिजते ते गोळाच होते.


Bee
Thursday, September 28, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि पूनम कांद्याच्या पातीला spring onion म्हणतात green onion नाही..

बीबीचा विषय मराठीत लिहायचा असेल तर तोच dev2 TAG वापरायचा.


Psg
Thursday, September 28, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स दिनेश. हो, पीठ कमी पडत असेल कदाचित.. पुढच्यावेळी सुधारणा करीन..

बी, हा बीबी मी सुरु केला नाहीये.. green onion हे मी दिलेले नाव नाही.. मी फ़क्त माझी शंका इथे लिहिली होती..


Lalu
Thursday, September 28, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीठ कमी पडत असेल किंवा दिनेश नी लिहिल्याप्रमाणे बेसन चिकट असेल. थोडे ज्वारीचे पीठ घालून बघ त्यात. भाजणीमुळे पण कोरडे होते कारण भाजणीत असते ज्वारीचे पीठ. करताना पसरट भांड्यात किंवा पॅन मधे केलीस तर परतताना सगळीकडे आच लागून कोरडी होईल.

Shonoo
Thursday, March 08, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी आणि लिम्बूटिम्बू यांनी पातीच्या कांद्याच्या च डाळ किंवा उ डाळ घालून भाज्यांचा उल्लेख केलाय ( पार्ले बी बी वर ). कुणी रेसिपी लिहिणार का प्लीज?



Bee
Friday, March 09, 2007 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, त्या लिम्ब्याचे काही मनावर घेत जाऊ नकोस. तो खरच काही शिजवत नाही घरात (खायचे प्यायचे शिजवत नाही असे मी म्हणत आहे, बाकी कटकारस्थान शिजवत असेल तर मला ठाव नाही :-)..)

तर डाळी घालून पातीचा कांदा करायचा असेल तर हरभरा, तुर, उडीद, मुग, चणा ह्यापैकी कुठलीही एक डाळ धुवुन त्यातील पाणी निथळून एका पातेल्यात काढून ठेवावी.

मग पातीचा कांदा चिरुन तोही बाजूला काढून ठेवावा.

मग दोन लसणाच्या पाकळ्या सोलून घ्याव्यात.

नंतर जिरे, मोहरी, तेल, तिखट, हिंग घालून साधीच फ़ोडणी करावी. आधी पातीचा कांदा घालावा, त्याला अरतपरत करुन त्यावर झाकण ठेवावे. लगेच मिनिटाभरानी झाकण काढून त्यात डाळ घालावी. मंद आचेवर डाळ बुडी लागणार नाही ह्या हेतूने ही भाजी शिजू द्यावी. भाजी शिजेस्तोवर पोळ्या लाटून आणि तेल लावून होतात.

हा लिम्ब्या म्हणतो चणा डाळच घ्यावी. मी आपली घरात असेल नसेल ती डाळ घेतो. इथे कुणी चुका काढेल अशी परिस्थितीच नाही तेंव्हा आपलेच चालू द्यावे :-)

डाळ जर घालायची नसेल तर बेसन भाजून पेरावे. पण त्याला जरा पात जास्त लागते. ही भाजी छान चवदार होते. मग ती ढोबळी मिर्ची असो, चिवळ असो, मेथि असो, पात असो, पालक असो, कोबी असो.. पिठ पेरून भाजी छानच होते.


Limbutimbu
Friday, March 09, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> असेल तर हरभरा, तुर, उडीद, मुग, चणा ह्यापैकी कुठलीही एक
हरभरा आणि चणा डाळीत काय फरक हे रे भाऊ????????? ddd

>>>> तो खरच काही शिजवत नाही घरात (खायचे प्यायचे शिजवत नाही असे मी म्हणत आहे, बाकी कटकारस्थान शिजवत असेल तर मला ठाव नाही ..)
अगदी बरोब्बर! मी काही शिजवत नाही... अगदी कटकारस्थानही!
मात्र दुसर्यान्नी "शिजवलेली कटकारस्थाने" "उधळवण्या ऐवजी" अगदी आवडिने चिवडुन चिवडुन चविचविने हादडतो!

Bee
Friday, March 09, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या डाळी वळखण्यात तरी तू पास झालास की रे, भले भाज्या वळखण्यात मागे, मागं पडला होतास :-)

चला ह्यापुढे टीप्या नकोत इथे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators