|
normally those herbal products are to be taken after the food. and then makes you go to restroom in an hour. khallela saaf. swatahacha anubhav. mala tari tyat kahi artha vatat nahi. diet is ok. it changes your diet after you do this diet.
|
Ajjuka
| |
| Sunday, May 27, 2007 - 11:52 am: |
| 
|
आयला... इथे एवढी चर्चा झालीये माहित नव्हते. मी पण करतेय हे प्रकरण सध्या. आज दुसरा दिवस आहे. भाज्यांचा.. मी उकडून त्यावर थोडसं तिखट मीठ घातलंय (मीठ संपूर्णपणे तोडणं जीभेला आणि शरीरालाही शक्य होणार नाही) आणि अर्धा लॉट सॅलड चा आहे. उकडलेल्या भाज्यांमधे पालक, शेपू, अळू, कांद्याची पात आणि कांदा, दुध्या, भेंडी, गाजर, बीट तर कच्च्या भाज्यांमधे मोड आलेले मूग, लेट्यूस ची पाने, लाल कोबी, काकडी, गाजर, मक्याचे दाणे असं सगळं घालतेय. काल संध्याकाळी फळांच्या अतिरेकाने कंटाळा आला तेव्हा चाट मसाल्याला शरण गेले. त्या मानाने आजचा दिवस सोप्पा वाटतोय. सुरुवातच बटाट्याने करायची होती ती मी अगदी प्रेमाने केली. रोज सकाळी रिकाम्यापोटी वजन करतेय. आज एक किलो उतरलंय. वजन उतरेल हळूहळू पण सिस्टीम ची सफाई महत्वाची आहे ती होतेय त्यामुळे बेस्ट. दूध केळ्याचा मला काहीही प्रॉब्लेम नाही येणार.. शेवटी मी सदाशिव पेठी ना.. ही ही ही. पण आयुर्वेदाप्रमाणे हे विरूद्ध अन्न आहे त्यामुळे दोन्हीमधे वेळेचे अंतर ठेवूनच करायला हवे. उपाशी राहू नका.. खात रहा हा मंत्र होता म्हणून मी अश्या गोष्टीला सुरुवात केली. आता हे ७ दिवस झाले की आठवड्यातला एक दिवस सॅलड, उकडलेल्या भाज्या आणि फळे यावर काढायचा असे ठरवलेय. खरंतर रोजचे १ जेवण फक्त सॅलडस घेतले तर उत्तम होईल पण रोज एवढी चिराचिरी करत बसायला वेळ नाही होणार. व्यायाम काय मला physiotherapist ने दिलेला आहेच तो करावाच लागतो. त्याहून जास्त काही करत नाहीये आत्ता पण पोहणे सुरू करावे असं ठरवतेय.
|
Giriraj
| |
| Monday, May 28, 2007 - 4:47 am: |
| 
|
बरं हे सगळं जेवणानंतर की आधी करायचं?
|
Ajjuka
| |
| Monday, May 28, 2007 - 6:06 am: |
| 
|
गपे गिर्या!! तुझं वजन वाढेल ना तेव्हा कळेल तुला... लोपे, बीफ च्या ऐवजी मश्रूम्स आणि अंड्यातला पांढरा भाग घ्यावा अस म्हनतेय. १० oz म्हनजे किति अंदि नक्कि?
|
Shyamli
| |
| Tuesday, May 29, 2007 - 1:47 pm: |
| 
|
लोपा सुट्टीवर आहे सध्या 
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:04 am: |
| 
|
oh.. sorry! mala mahit navhate!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|