|
Dineshvs
| |
| Wednesday, November 19, 2003 - 5:01 am: |
| 
|
एक तोंडल्याची वेगळी रेसिपी पाव किलो तोंडली ठेचुन घ्यावीत. पुर्वी ती पाट्यावर वरवंट्याने ठेचत असत. पण ते शक्य नसेल तर, एका खोलगट भांड्यात एकेक तोंडले घेऊन, ते जड बत्ता, बाटली किंवा लाटण्याने ठेचले तरी चालते. दहा ते बारा लसुण पाकळ्या ठेचुन घ्याव्यात. तीन चार लाल मिरच्यांचे तुकडे करावेत. तेलाची जिरे, हिंग लसुण व मिरच्या घालुन फ़ोडणी करावी. त्यात ठेचलेली तोंडली घालावीत. झाकण ठेवुन शिजवावे. मग त्यात खवलेले ओले खोबरे व मीठ घालुन, भाजी कोरडी होईपर्यंत परतावी. हा एक कारवारी प्रकार आहे, खुप छान लागतो.
|
Sashal
| |
| Thursday, October 21, 2004 - 3:50 pm: |
| 
|
भरली तोंडली कशी करतात?
|
Swabhi
| |
| Thursday, October 21, 2004 - 4:34 pm: |
| 
|
भरल्या तोन्डल्या साठी २ चमचे तीळ भाजुन घ्यावे २ चमचे सुके खोबरे भाजुन घ्यावे साधरण अर्धी वाटी ओला नारळ खवुन घ्यावा. हे सगळे मिश्रण वाटुन घ्यावे, त्यात चिन्चेचा कोळ, काळा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ एकत्र करुन तोन्डल्यात भरावे आणि तेलावर परतावे, रस आवडत असल्यास थोडे पाणी घालावे. कमी वेळात करायची असेल तर, तोन्डली आधी अगदी हलकी शिजवुन घ्यावी.
|
Swabhi
| |
| Friday, October 22, 2004 - 5:11 pm: |
| 
|
वरती मी दिलेल्या भरल्या तोन्डल्याच्या रेसिपी मधे गुळ विसरले होते, या भाजीला गुळ तर हवाच. Thanks लालु, आठवण करुन दिल्याबद्दल
|
Moodi
| |
| Wednesday, January 25, 2006 - 4:06 pm: |
| 
|
तोंडली तवा फ्राय. ही कृती अगदी भेंडीसारखीच आहे. भेंडी फ्राय भेंडी अन कांद्या ऐवजी यात तोंडली अन टॉमेटो वापरावे. मसाला वर भेंडीसाठी दिला आहे तोच ठेवावा. फक्त तोंडली धुवुन तिच्या गोल चकत्या कराव्यात अन टॉमेटोचा गर काढुन त्याचे पण छोटे तुकडे करुन तेलात अन मसाल्यात परतावे. गरम मसाल्याच्या बरोबर थोडी आमचुर अन सुंठ पावडर तसेच कच्ची बडीशेप घातली की हा मसाला तयार होईल. वांगी अन टॉमेटो सुद्धा असेच करता येईल.
|
Moodi
| |
| Wednesday, May 24, 2006 - 8:43 pm: |
| 
|
काजू तोंडली उपकरी साहित्य : पावशेर कोवळी तोंडली, मुठभर काजू तुकडे, 2- 3 हिरव्या मिर्च्या, २ लाल मिर्च्या, अर्धा चमचा उडीद डाळ, चवीसाठी गुळ, मीठ, फोडणीचे साहित्य. कृती : काजू पाण्यात भिजवावेत. तोंडली धुवुन कोरडी करावी अन त्याच्या उभ्या पातळ चकत्या कराव्या. पॅनमध्ये तेल तापवुन मोहरी अन उडीद डाळ घालावी. हिंग अन हळद चिमुटभर घालावी. अन लगेच उभ्या कापलेल्या हिरव्या मिर्च्या, लाल मिर्च्यांचे तुकडे, अन काजू व तोंडली घालावी. पॅनवर झाकण ठेवुन त्यात पाणी घालुन तशी शिजवावी. शिजत आली की गुळ, मीठ घालावे अन मग पूर्ण शिजली की उतरवावी. हा सारस्वती प्रकार आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|