|
MP , ७-८ लोकांसाठी, चहाबरोबर खायला हे पदार्थ कसे वाटतात बघ्: हिरवि मिरची, कोथिंबीर आणि ओला नारळ याची वाटुन चटणी करून सॅंडविचेस. indian market मधून चटण्या (गोड आणि तिखट) आणून, घरी काबुली चणे शिजवून पापडी चाट. तिथे पापड्या नाही मिळाल्या तर सरळ tortilla chips वापर. दही, शेव, कांदा, कोथिंबीर घातलं की काय छान लागत नाही? गोड काही करणार असशील तर fruit cream बढिया! हवी ती फळं कापून heavy cream आणि साखरेच्या मिश्रणात घाल. ह्यातला एकही पदार्थ बिघडणारा नाही बघ!
|
Dineshvs
| |
| Thursday, May 04, 2006 - 4:38 am: |
| 
|
सॅंडविच ओपन केले तर छान दिसतात. त्यासाठी फ़्रेंच कडक ब्रेड मिळाला तर चांगले. त्याच्या चकत्या कापुन वर सजावट करता येते.
|
मला जरा मदत हवी आहे. मला एक सरप्राईज मेनु ठेवायचा आहे शनिवरी झटपट आणि गोड बनणार मेनु २०-२५ माणसांसाठी हवाय. कोणि सांगु शकेल काय??
|
Shonoo
| |
| Thursday, May 04, 2006 - 11:55 am: |
| 
|
पुणेकर चहाबरोबर मिसळ पाव करता येइल. मटकीची उसळ, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, असे सर्व अगोदर करून ठेवता येइल. जरा वेगळा प्रकार. अमेरिकेतले पोटॅटो रोल वगैरे पेक्षा baguette चे पीसेस छान लागतात. Costco मधे मिळणार portugese रोल पण बरे लागतात
|
Savani
| |
| Thursday, May 04, 2006 - 2:09 pm: |
| 
|
आर्च, खास तुला बडावाला thanks द्यायला आले इकडे. तुझ्या रेसिपीज नी एक्दम बहार आणली माझ्या हळदी कुंकू कार्यक्रमाला. लाडू, चकल्या, काजू रोल्स सुपरहीट. कराडकर तुझ्या पद्धतिने पन्हं केलं. ते तर सुपर डुपर हीट. मी एक addition केली मात्र त्यात ते म्हण्जे साखरेच्या ऐवजी गुळ घातला होता. बाकी apple sauce , lemonade ते सगळे तसेच.
|
Maitri
| |
| Thursday, May 04, 2006 - 5:38 pm: |
| 
|
मला कश्या कुठल्याच रेसिपी सापडत नाहित?? मला पण कोणितरी शिकवा ना शोधायला... सावनी पन्हं कसं केलसं?? मला पण आवडेल करायला..
|
मला पण मेन्यु सुचवा प्लीज कोणीतरी. ८ जणं. त्यात एकाचे आई, वडील आणि २ कपल्स बाकीचे दोघे सडेफ़टींग. veg हवा मेन्यु म्हणजे बाकी लोक्स खातात nonveg पण मला करायला जमायच नाही. सगळे मराठी आहेत. मी नेहमीप्रमाणे अतीउत्साहाने सगळ मी करते म्हणून काम अंगावर घेतल आहे.
|
तुला मराठीच मेनू हवा का?
|
Mrinmayee, Shonoo, Dinesh thanx.. Mast ani sutsutit dishes suchvlyabaddal! Udya maitrini yetil teva chaha barobar sandwitches ani chat karte. Dinesh, tumhi sangitlyapramane cut karun decorate karaycha prayatna karte! Saturday la kahi friends yenar ahet 4 vajta teva Misal karen mhanje adhich tayari zali ki mast gappa marta yetil
|
Savani
| |
| Thursday, May 04, 2006 - 7:16 pm: |
| 
|
मैत्री ही घे लिन्क. मी lemonade आणि apple sauce घालून केलं. फ़क्त साखरेच्या ऐवजी गुळ घातला. आणि भरपूर वेलची आणि केशर /hitguj/messages/103383/4637.html?1076446237
|
मेन्यु मरठीच हवा अस काही नाही. पण लवकर होणारा
|
Prady
| |
| Thursday, May 04, 2006 - 7:58 pm: |
| 
|
रचना हा मेनू बघ कसा वाटतो. वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या घेऊन stuffed Simala mirachee . भरली मिरचीचा बीबी रेफ़र कर. कोफ़्ता करी किंवा व्हेज कुर्मा, corn चं रायतं कैरी मिळाली तर ताजा टक्कू. पुलाव, टोमॅटो चं सार, पोळ्या किंवा frozen नान, starter म्हणून मसाला पापड किंवा डाळ वडे, मेथी पकोडा असं काही तरी. गोड म्हणून गुलाब्जाम, रसगुल्ले किंवा Apple pie with ice cream
|
Arch
| |
| Thursday, May 04, 2006 - 10:06 pm: |
| 
|
रचना, आमसुलाच सार नारळाच दूध घालून, जिरा, हिंग, मिरची, कढिपत्याची फ़ोडणी घालून. डब्यातल नारळाच दूध वापरता येत. brand बघून घे मात्र. उकडलेल्या बटाट्याची किंवा भेंडिची परतून भाजी मुगाची किंवा मटकिची उसळ. त्याबरोबर बारिक चिरून कांदा, tomato कोथिंबीर आणि शेव ठेवलीस तर ती छान side dish पण होते. मिरच्या, काजू, दाण्याचा कूट, बेदाणे घालून पंचामृत. एखादी कोशिंबीर, चपाती, भात. वेळेप्रमाणे, आधी करून ठेवता येणारा गोडाचा पदार्थ बघ. बदामाचा शीरा, किंवा दुधिहलवा गुलाब इसेन्स घालून छान होतो दुधिहलवा. अमसुलाच सार आणि भात सोडून सगळ आधल्या दिवशी करून ठेवता येईल बघ. मराठी मेनु आहे पण बदल हवा असेल तर एखादी पनीर डिश बघ खुल पनीर वाली. पण मग सार नको दुसर काही चालेल.
|
thanks मी कळवते तुम्हाला. ह्या रविवारी. काय काय केल आणि कस कस झाल.. माझ्या मैत्रीणीने सल्ला दिला आहे की ८ जणं येणार असतील तर १५ जणांचा स्वयपाक कर तो सल्ला लक्षात ठेवला आहे.
|
Maitreyee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:46 pm: |
| 
|
रचना ही मैत्रिण आधी तुझ्याकडे येऊन गेलिये का जेवायला
|
Chafa
| |
| Wednesday, May 10, 2006 - 1:44 pm: |
| 
|
या शनीवारी आमच्या ऑफीसमधल्या group चा potluck dinner आहे. २० जण असणार आहेत. मला सोपी सुटसुटीत चांगली आणि मला करता येईल अशी महाराष्ट्रीयन डीश सुचवा. मंडळी जास्त करुन दक्षिण भारतीय, आणि काही अमेरिकन आणि बल्गेरीयन आहेत.
|
चाफ़्या, main dish च करायचीय असे काही आहे का? नाहीतर dessert घे आणि मस्त पैकी श्रीखंड कर. केशर, वेलची, जायफ़ळ असे घालून, शिवाय वर हवे तर काजू पिस्ते वगैरे! करायला सोपे. गंमत वाटेल पण माझा अनुभव असा आहे की या south indian लोकांना फ़ार limited desserts येतात. श्रीखंड वगैरे तर येत च नाही. आवडते मात्र सगळ्यांना.
|
मिसळ पाव, सुटसुटीत, झटपट अन भरपुर होते. मी एकदा केला होता अशा पार्टीत, हिट झाला होता.
|
Ninavi
| |
| Wednesday, May 10, 2006 - 4:22 pm: |
| 
|
बटाटेवडे ने चाफ्या. नाहीतर कांदा, बटाटा, मिरची भजी.
|
Chafa
| |
| Wednesday, May 10, 2006 - 5:16 pm: |
| 
|
नाही main dish मी कसली नेणार! श्रीखंडाची idea छान आहे, सगळ्यांना आवडेलही. त्यात थोडे sour cream ढकलून दिले तर चालेल ना quantity वाढवायला? (२० जणं आहेत म्हणून...) मिसळ आणि बटाटेवडे मला करता येत नाहीत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|