|
Dineshvs
| |
| Monday, January 09, 2006 - 4:57 pm: |
| 
|
मेतकुट पुर्वी मेतकुट अगदी घरोघर असायचेच. काय असेल ते असो, पण प्रत्येक बाईच्या हातच्या मेतकुटाची चव वेगवेगळी लागायची. आणि प्रत्येक घरात मेतकुट खायचे नवीन नवीन प्रकार दिसायचे. मेतकुट हे जमावे लागते. दोन वाट्या चण्याची डाळ, एक वाटी ऊडदाची डाळ, अर्धी वाटी तांदुळ, पाव वाटी गहु, पाव वाटी काळि मोहरी, दोन चमचे जिरे, दोन चमचे हिंगाची पुड, दोन तीन लाल मिरच्या, अर्धा चमचा मिरीदाणे, एखादे हळकुंद, दोन चमचे धणे, अर्धे जायफ़ळ, एखादा सुंठिचा तुकडा. शक्यतो लोखांडी कढईत, धान्ये भाजायला घ्यावीत. हि धान्ये कोरडीच भाजायची असल्याने खुप वेळ लागतो. पण तरिहि संयमाने भाजायची, प्रत्येक धान्याचा खमंग वास आला पाहिजे, तरिहि काहिहि करपता कामा नये. हिंग, हळकुंड, जायफळ वैगरे भाजता येत नाही, त्यामुळे ईतर धान्ये भाजताना, शेवटी ते टाकुन जरा गरम होवु द्यावे. जसजसे भाजत जाऊ तसतसे ते एखाद्या पेपरवर पसरत जावे. त्यावर पेपर झाकावा म्हणजे वाफ धरत नाही. मग सगळे एकत्र करुन अगदी बारिक दळावे. मैद्याच्या चाळणीने चाळुन घ्यावे. दोन तीन बाटल्यात भरावे. वरती हिंगाचा खडा ठेवावा. धान्ये अशी खमंग भाजल्याने पाण्याचा अंश निघुन जातो, व ते खुप टिकते.
|
Tanya
| |
| Thursday, April 06, 2006 - 2:27 pm: |
| 
|
दिनेशदा...तुम्ही दिलेल्या कृतीप्रमाणे मेतकुट केले. आणि त्यामुळे साध वरण-तुप-भातही अतिशय रुचकर लागायला लागलय. इतके दिवस भारतातुन आणलेल मेतकुट संपल, की भारतातुन कोणी येणारे आहे का याचा शोध घेतला जायचा. पण तुम्ही दिलेल्या कृतीमुळे इथे, घरच्या घरी एवढ खमंग मेतकुट बनवायला यायला लागलं. all credit goes to you. Thanks a lot
|
Dineshvs
| |
| Thursday, April 06, 2006 - 4:48 pm: |
| 
|
Tanya मला नेहमी नवल वाटतं कि आपले पारंपारिक पदार्थ कुठल्या अन्नपुर्णेच्या कल्पनेतुन जन्मले असतील. हे घटक पदार्थ एकत्र करायचे, ते भाजायचे, ते कसे वापरायचे पहिल्यांदा कुणाला सुचलं असेल ? त्यात काय काय बदल, सुधारणा झाल्या असतील ? हि चव तिच्या किंवा त्या सगळ्याजणींच्या प्रयोगांचे फलित आहे. त्यामुळे हे सर्व श्रेय त्या अनाम गृहिणींचे. मी तो भारवाही हमाल.
|
Vrushs
| |
| Saturday, October 14, 2006 - 2:14 am: |
| 
|
दिनेश पण हे मेतकूट अमेरिकन मिक्सरवर बारिक होईल का?
|
Dineshvs
| |
| Saturday, October 14, 2006 - 3:41 am: |
| 
|
बारिक होईल, पण दोन तीनदा करावे लागेल. धान्य भाजुन कोरडे होते त्यामुळे सहज दळले जाते. चाळुन मात्र घ्यावे लागेल.
|
Vrushs
| |
| Sunday, October 15, 2006 - 12:46 pm: |
| 
|
Thank U दिनेश, मी दीड वर्ष झाली, Us मध्ये आहे.पण दीड वर्षानंतर बहुतेक आता मेतकूट खायला मिळेल.
|
Vrushs
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:52 pm: |
| 
|
दिनेशदा,आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेतकुट केले.मस्तच जमलेय. Thank u so much.
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 31, 2007 - 2:29 am: |
| 
|
Vrushs या चवीत आपल्या मराठी लोकांचे काहितरी भावबंध गुंतलेत हे नक्की. एक भावनिक समाधान मिळते, मेतकुटाने. ईतर कुणाला हि चव आवडेलच असे नाही.
|
Rads
| |
| Saturday, November 03, 2007 - 5:27 am: |
| 
|
दिनेशदा, तुम्ही लिहिल्याप्रमाणे मी पहिल्यांदाच मेतकुट करुन पाहिले, खरोखरच फार छान झाले आहे. खूप छान माहिती बारकाव्यानिशी देता, उपयोग होतो. Thks.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|