|
Nandita
| |
| Tuesday, December 27, 2005 - 5:39 am: |
| 
|
maUDI Á saurNaacyaa kTlaoT caI vaaT laagalaI imaEaNa Kupca patL Jaala Aijabat paNaI na Takta DaL vaaTlaI trI. saurNa inaqaLuna na Gaotlyaa mauLo Asaava
kaÆ
|
Madya
| |
| Tuesday, December 27, 2005 - 8:31 am: |
| 
|
कटलेट रात्री करुन दुसरे दिवशी जेवणामधे वापरता येतिल का? कि खराब होतिल? रात्री केलेले कटलेट दुसरे दिवशी टिकवण्यासाठी काय करावे?
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 27, 2005 - 6:06 pm: |
| 
|
कटलेट वळुन किंवा मिश्रण तसेच झाकुन फ़्रीजमधे ठेवावे. मिश्रण ठेवले तर दुसर्यादिवशी त्याला पाणी सुटलेले नाहिना हे बघुन घ्यावे. वरीलप्रमाणे मिश्रण पातळ झाले तर नायलॉनच्या गाळणीत मिश्रण ओतुन एका भांड्यात अधांतरी फ़्रीजमधे ठेवावे. पाणी निथळते. भरच घालायची असेल तर तांदळाचे पीठ, भाजलेला रवा, भाजलेला डाळीचा रवा असे काहितरी वापरावे. अशी भर घातली तर तिखट मीठ परत घालावे. हिरवी मिरची, आले लसुण वाटण वैगरे घालावे म्हणजे फ़िकेपणा येत नाही.
|
Nandita
| |
| Thursday, December 29, 2005 - 4:06 am: |
| 
|
Dinesh thanku .. ..
|
Seema_
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:16 am: |
| 
|
फ़रसबीचे patties साहित्य: सारणासाठी फ़रसबी आले+लसुण+हिरव्या मिरच्याची पेस्ट जिरे , हिंग तेल चार पाच चमचे कांदा अर्धी वाटी अगदी बारीक चिरुन ( किंवा सरळ chopper मधुन काढावा ) ओले खोबरे optional मीठ वरच्या कव्हरसाठी बटाटे पाच ते सात कॉर्न फ़्लोअर किंवा ब्रेड क्रम्स ( काहीच नसेल तर ब्रेड ओला करुन त्याचे दोन काप ) थोडा रवा मीठ क्रुती फ़रसबी धुवुन अगदी बारीक चिरुन घ्यावी.साधारण दोन ते अडीच वाट्या घ्यावी . पाच सहा चमचे तेल फ़ोडणी साठी गरम करावे. हिंग जिरे टाकुन कांदा परतुन घ्यावा. नंतर आले,लसुण मिरचीची पेस्ट टाकावी . आता चिरलेली फ़रसबी टाकुन परतुन घ्यावी. मिठ,खोबर टाकुन,चवीनुसार मिठ,साखर टाकावी. एक वाफ़ आणावी . भाजी फ़ार ओलसर होवु द्यायची नाही . थोडावेळ डिशमध्ये पसरावी आणि गार होवु द्यावी . बटाटे शिजवुन घ्यावेत. कुस्करुन त्यात १ ते दिड चमचा corn flour घालाव . चवीपुरत मिठ घालुन एकसारख करुन घ्याव. छोटे छोटे चपटे गोळे करुन त्यात सारण भरुन patties तयार करावेत . ब्रेड क्रम्स किंवा रव्यात घोळुन deep fry करावेत . टिप : patties फ़ुटुन सारण बाहेर येत आहे अस वाटल तर दोन चमचे corn flour ची paste करुन त्यात pattice बुडवुन घ्यावेत आणि मग रव्यात घोळावेत . काही झाल तर फ़ुटणार नाहीत मग . माझ्या २२ महिन्याच्या मुलीला खुपच आवडतात हे . म्हणुण मी मिरची खुप कमीच घालते . Source : कुठुन तरी लिहुन घेतलेली .
|
Manuswini
| |
| Monday, October 23, 2006 - 10:49 pm: |
| 
|
मुंबईच्या कटलेट मध्ये गाजर नी बीट असे ज्यास्त असते. आणी आरारूटचे cover असते पातळ. इथे कोणीतरी लिहिलेले आहे तसेच बीट,गाजर, कोबी, मटार, उकडलेला बटाटा कुसकरून नी वाफ़वून घेवून एकत्र करून मग आरारूटची पातळ paste मध्ये डूबवून shallow fry करायचे. वरील मिश्रणात आले, लाल मिरची, एखादी लसुण, मिठ,कोथींबीर,लिंबू पिळून घालावे. कटलेसना bread crumbs आवरण मी पाहीले नाही. बरोबर पुडीन चटणी.
|
Surabhi
| |
| Friday, December 08, 2006 - 10:21 am: |
| 
|
मटार पॅटीस. सोललेले मटार साधारण एक वाटी भरून असतील तर ५-६ बटाटे उकडून, १ / २" आले, २-३ हिरव्या मिर्च्या, एक कांदा, गरम मसाला, कोथंबीर, लिंबाचा पाव तुकडा. तेलात हिंग, जीरे, दोन कढीपत्त्याची पाने फोडणीत टाकून बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. त्यात मटार टाकून परतावे. बारीक चिरलेले आले व मिर्च्या पण मटाराबरोबरच परतून थोडे पाणि टाकून मटार मऊ शिजवून घ्यावे.पाणी आटून मटार कोरडे झाले की त्यातलेच थोडेसे तिथल्या तिथे चेचून घ्यावे म्हणजे सारण जरा मिळून येते. मग त्यात मसाल्याची पूड, कोथंबीर व पाव लिंबू पिळावे. हे सारण कोरडे होईपर्यंत परतावे. आअवदी प्रमाणे काजू-बेदाणे पण घालू शकता. मसाल्यासाठी: एक टिस्पून खसखस व एक टे. सुके खोबरे भाजून कुटून त्यात अर्धा चमचा तयार गरम मसाल घालावा किंवा ताज़ा हवा तर २ लवंगा, एक छोटा दालचीनी तुकडा, २ वेलच्या, १ / ४ टि. बडिशेप व १ / ४ टि. धणे भाजून कुटावे. ह्याने सारण खमंग होते. उकडलेले बटाटे चांगले कुस्करून त्यात एक पावाची स्लाईस भिजवून कुस्करून घालावी. मीठ व रंगापुरती किंचीत हळद्-तिखट घालून लगदा मळून घ्यावा. तेलाच्या हाताने गोळे बनवून हातावरच पारी थापून त्यात चमचाभर सारण भरून पॅटीस वळावे. ब्रेडक्रम्स किंवा रव्यामधे हलकेच दाबून तव्यावर तेल सोडून golden रंगावर shallow fry करावे. टोमॅटो केचप बरोबर खावे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|